Ghee Vs Oil: भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. त्याशिवाय धार्मिक विधींमध्ये तुपाचा वापर करतात. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमितपणे एक चमचा तूप खाल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. तूप खाल्यामुळे शरीराला आतून पोषण मिळते. आयुर्वेदामध्ये तुपाला अमृतासमान मानले जाते. डॉक्टरांकडे गेल्यानंतरसुद्धा निरोगी आरोग्यासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. मग जर आपण सगळंच जेवण तेलात न बनवता तुपात बनवलं तर? ते अधिक फायदेशीर ठरेल की काही नुकसान होईल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूप तुमच्या शरीराला कसे फायदेशीर ठरते?

तुप कमी प्रमाणात सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

१. पचनशक्ती वाढवते. डॉ आशुतोष गौतम सांगतात की तूप हे पचायला हलके आहे आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते. हे नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

२. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते – तुपाच्या सेवनानं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय, त्यात चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे असतात जे सर्वांगीण विकासास मदत करतात.

३. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर – पोषणतज्ञ रुपाली दत्ता सांगतात की, कमी प्रमाणात सेवन केल्यावर, रिफाइंड तेलांच्या तुलनेत तूप हा हृदयाच्या आरोग्यासाठी एक सुरक्षित पर्याय आहे.

४. तूप वजन कमी करण्यास मदत करते – प्रख्यात पोषणतज्ञ रुजुता दिवेकर म्हणतात की, तूप चयापचय नियंत्रित करण्यास मदत करते आणि हट्टी चरबी जाळण्यास मदत करते.

जेवण करताना तेलाएवजी तूप वापरावे का?

तुम्ही तुमचे सर्व जेवण शिजवण्यासाठी तूप वापरावे का? अजिबात नाही. तुपाचे भरपूर फायदे असले तरी, त्याचा अतिवापर योग्य नाही. पोषणतज्ञ अमिता गद्रे यावर सांगतात की, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑइल आणि करडई तेल या सर्व तेलांमध्ये जे पोषक तत्त्वे असतात जे फक्त तूप देऊ शकत नाही.

तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पुढील फायदे होऊ शकतात

पचनक्रिया सुधारते

पारंपरिकपणे तूपसेवनामुळे पचन सुधारते, आतड्यांचे आरोग्य वाढवते आणि नियमित आतड्यांसंबंधीच्या हालचालींना समर्थन देते, असे मानले जाते; मुख्यत्वे तुपातील ब्युटीरिक अॅसिड आणि निरोगी चरबीमुळे. ब्युटीरिक अॅसिड आतड्याच्या पेशींना समर्थन देण्यासाठी ओळखले जाते आणि ते दाहकविरोधी फायदे देऊ शकते. तर क्लिनिकल संशोधनानुसार, कोमट पाण्यासोबत तूप सेवन केल्याने पचनशक्ती वाढवते किंवा रिकाम्या पोटी सेवन केल्यास ते फायदेशीर ठरते. तसेच, तुपामध्ये संतृप्त चरबी असते, ज्याचे सेवन काळजीपूर्वक केले पाहिजे; विशेषत: उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची चिंता असलेल्या व्यक्तींनी. कारण- तुपाच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते. थोडक्यात कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

हाडे मजबूत होतात

कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. त्यामधील कॅल्शियम हाडे निरोगी ठेवते. तसेच ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण होते. तुपाचे सेवन केल्यामुळे जळजळ कमी होते. त्यामुळे कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे.

त्वचेसाठी फायदेशीर

कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. तुपामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला आतून पोषण देण्यासाठी मदत करतात. त्याशिवाय नियमित सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन, त्वचा चमकदार आणि उजळ दिसते. त्यामुळे नियमित तुपाच्या पाण्याचे सेवन करावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should you cook everything in ghee pros and cons you need to know srk