जखडलेल्या खांद्याची सोडवणूक कशी करावी याविषयी आपण यावेळीही चर्चा करणार आहोत. या व्यायाम प्रकारातही आपण दुपट्टा किंवा लांब कापड वापरावे.

कसे कराल?

सर्वप्रथम दुपट्टा दोन्ही हातात धरून पाठीमागे घ्या. जर तुम्हाला डाव्या खांद्यासाठी व्यायाम करायचा असेल तर डावा हात कोपरापासून काटकोनात वाकवा आणि उजवा हात थोडासा वाकवा. मात्र या दोन्ही हातात दुपट्टय़ाचे टोक मात्र घट्ट धरून ठेवले पाहिजे. (छायाचित्र क्रमांक १ पाहा.)

आता उजव्या हाताने हा दुपट्टा खेचून वरच्या बाजूला हळूहळू खेचा. जेणेकरून डावा हात पाठीच्या कन्यापर्यंत खेचला जाईल. त्यामुळे जखडलेल्या खांद्याची सोडवणूक होईल. (छायाचित्र क्रमांक २ पाहा.)

हाच व्यायाम आता दुसऱ्या खांद्यासाठी हात बदलून करता येईल.

dr.abhijit@gmail.com

Story img Loader