Shravan Monday & Important Festivals 2023: श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आषाढ अमावस्येनंतर यंदा तब्बल ५९ दिवसांचा श्रावण महिना असणार आहे. या वर्षीच्या श्रावण महिन्यात चार किंवा पाच नव्हे तर आठ सोमवार असतील. अधिक मासामुळे यंदा श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. अधिक मासामुळे यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही १८ जुलै रोजी होणार आहे. तर १४ सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे. उत्तर भारतात श्रावण महिना आपल्या आधी सुरू होतो. उत्तर भारतात श्रावणाची सुरुवात ४ जुलै रोजी होते आणि तो ३१ ऑगस्टपर्यंत असेल.
अधिक श्रावण महिन्यामुळे श्रावणातील अनेक सणांच्या तारखा सुद्धा यंदा बदलणार आहेत. या बदललेल्या तारखांनुसार सणांचे वेळापत्रक पाहूया…
- २० ऑगस्ट- श्रावण विनायक चतुर्थी
- २१ ऑगस्ट- श्रावणी सोमवार व नागपंचमी
- २७ ऑगस्ट- पुत्रदा एकादशी
- ३० ऑगस्ट- नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन
- ३ सप्टेंबर- संकष्टी चतुर्थी
- ६ सप्टेंबर- श्रीकृष्ण जयंती (कृष्णजन्म उपवास)
- ७ सप्टेंबर- दहीहंडी
- १० सप्टेंबर- अजा एकादशी
- १४ सप्टेंबर- पोळा (श्रावण अमावस्या)
यंदा अधिक मासामुळे तब्ब्ल ८ श्रावणी सोमवार असणार आहेत, त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे:
- पहिला श्रावणी सोमवार: २४ जुलै
- दुसरा श्रावणी सोमवार: ३१ जुलै
- तिसरा श्रावणी सोमवार: ७ऑगस्ट
- चौथा श्रावणी सोमवार: १४ ऑगस्ट
- पाचवा श्रावणी सोमवार: २१ऑगस्ट
- सहावा श्रावणी सोमवार: २८ऑगस्ट
- सातवा श्रावणी सोमवार: ४ सप्टेंबर
- आठवा श्रावणी सोमवार: ११ सप्टेंबर
दरम्यान, अधिक मासामुळे यंदा गणपतीच्या आगमनातही विलंब होणार आहे. गणपती बाप्पा यंदा १९ सप्टेंबर रोजी आपल्या घरी येणार आहेत. १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत मलमास अधिक असणार आहे, या कालावधीत शंकरासह विष्णूच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व असते.