अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं आज ११ नोव्हेंबरला निधन झाले. ‘कुसुम’, ‘वारीस’, आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याच्या निधनानंतर हिंदी मालिका विश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यामागे त्याची पत्नी अलेसिया आणि दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान, जिममध्ये व्यायाम करत असतानाच सिद्धांत याला हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हल्ली व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. याआधी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचेही निधन जिममध्ये व्यायाम करत असताना झाले होते. मात्र, या घटनांमध्ये का वाढ होत आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला आहे.

जिममध्ये व्यायाम करताना निधन होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आता लोकांमध्येही घबराट पसरू लागली आहे. वर्कआऊट केल्यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा समजही लोकांमध्ये वाढीस लागला आहे. आज आपण यामागील कारणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कार्डिओलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे अध्यक्ष प्रोफेसर के श्रीनाथ रेड्डी म्हणाले की व्यायामाच्या वेळी केलेल्या कठीण हालचालींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार हे निदान झालेल्या किंवा न झालेल्या हृदयातील ब्लॉकेजमुळे होऊ शकते.

गेल्या आठ वर्षांपासून खात होती स्वतःचेच केस; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही…

जास्त व्यायाम केल्याने हृदयाच्या धमन्यांमधील एरिथेमॅटस प्लेक फुटू लागते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळेच व्यक्तीने आपले वय लक्षात घेऊन व्यायाम करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, जर तुम्हाला तुमच्या हृदयाशी संबंधित समस्या आहेत परंतु तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करणेही आवडत असल्यास, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • जर तुम्ही जिममध्ये कठोर व्यायाम करत असाल तर शरीराच्या गरजेनुसार पोषक आहार घ्या. जास्त तेलकट आणि जंक फूड खाणे टाळा.
  • श्वासोच्छवासाचा व्यायाम तुमच्या रक्तप्रवाहावर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच, तीव्र वर्कआउट्स दरम्यान आपल्या शरीराला आराम देण्यास विसरू नका.
  • बरे वाटत नसल्यास काही दिवस जिमला जाणे टाळा. अशा दिवसांत जिमला जाणे धोक्याचे ठरू शकते. तसेच, यावेळेस कठोर व्यायाम करू नका आणि तुमच्या शरीराला जास्त ताणण्याचा प्रयत्न करू नका.
  • तुमच्या शरीराला शक्य असेल तितकाच व्यायाम करा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता भिन्न असते. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी योग्य असेल असाच व्यायाम करण्याला प्राधान्य द्या.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhaanth vir surryavanshi why is the incidence of heart attacks increasing while exercising at the gym read what experts say pvp