Side Effects Of Baking Soda: बेकिंग सोडा हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे कारण तो अनेक प्रकारच्या केक, ब्रेड, बेकरी उत्पादनांमध्ये वापरला जातो, ज्यामुळे पदार्थ फुगतात. काही लोकांना सोडा वॉटरही प्यायला आवडते. बेकिंग सोडा जर मर्यादित प्रमाणात वापरला गेला तर तो वाईट नाही, पण तो जास्त प्रमाणात खाणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, बेकिंग सोडाच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरावर कसा वाईट परिणाम होतो.
बेकिंग सोडा जास्त खाण्याचे तोटे
पोटात गॅस होणे
जास्त बेकिंग सोडा खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो, ज्यामुळे पोट फुगणे किंवा ब्लॉटिंगची समस्या होते. जेव्हा तुम्ही सोडा खाता तेव्हा तो रासायनिक प्रक्रियेत आम्लात मिसळतो. म्हणूनच बेकिंग सोडा मर्यादित प्रमाणात घ्या.
हृदयविकाराचा झटका
बेकिंग सोडामध्ये भरपूर सोडियम असते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. या पदार्थामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जे लोक जास्त बेकिंग सोडा खातात त्यांना हृदयविकाराच्या अनेक केसेस येतात. म्हणूनच त्यांचे सेवन कमी करणे फार महत्वाचे आहे.
( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
बेकिंग सोडा किती प्रमाणात सेवन करावे?
जर तुमचे पचन खराब असेल तर अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि प्या, आठवड्यातून फक्त २ वेळा सेवन करा, अन्यथा तुमच्या समस्यांना तुम्ही जबाबदार असाल.