ब्रेसियर हा महिलांच्या पोशाखातील एक महत्त्वाचा भाग आहे. घरातून बाहेर पडण्याआधी महिलांना सर्वात आधी ब्रेसियर परिधान करावी लागते. दिवसभर महिलांना या ब्रेसियरचा वापर करावा लागतो. ब्रामुळे केवळ योग्य फिटिंगमध्येच मदत होत नाही, तर महिलांच्या स्तनाचा आकार योग्य ठेवण्यासाठीही मदत होते. स्त्रियांच्या या ब्राचे एक सोडून अनेक प्रकार असतात. त्यामुळे महिला आपल्या कपड्यांप्रमाणे ब्राचा प्रकार निवडतात. ब्रा रोज वापरत असल्याने ती कम्फर्टेबल असणे गरजेची असते, त्यामुळे ब्रा वेळोवेळी बदलली पाहिजे. असे न केल्यास तुमचे आरोग्यही बिघडू शकते.
जुनी ब्रा जास्त दिवस परिधान केल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. यामुळे तुमच्या स्तनाचा आकारही बिघडतो. यामुळे महिलांनी जास्त दिवस एकच ब्रा घातल्याने गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. जुनी ब्रा आरोग्यावर कधी परिणाम करू लागते आणि त्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात जाणून घ्या…
Diwali 2023 : दिवाळीत तुम्हीही सेलिब्रिटींसारखे दिसाल सुंदर; फॉलो करा मेकअपच्या ‘या’ सोप्या स्टेप्स
एकच ब्रा जास्त दिवस घातल्याने होतात ‘हे’ गंभीर परिणाम
१) रक्ताभिसरण क्षमतेवर होतो परिणाम
बर्याच वेळा स्तनाचा आकार वाढू लागतो. परंतु, स्त्रिया त्याच जुन्या ब्रा घालणे सुरू ठेवतात. अशा परिस्थितीत घट्ट आणि खराब फिटिंग ब्रा घातल्यामुळे अस्वस्थता जाणवते. त्यामुळे काही नसा दाबल्या जातात. इतकंच नाही तर श्वास घेण्यासही त्रास होतो. त्याचा रक्ताभिसरण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही, त्यामुळे नसा खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
२) त्वचेशी संबंधित समस्या
ज्याप्रमाणे कोणत्याही वस्तूची एक्सपायरी डेट असते, त्याच प्रकारे जुनी ब्रा टाकून देण्याचीही एक ठराविक वेळ असते. वर्षानुवर्षे तीच ब्रा परिधान केल्याने त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि त्वचा सेंसिटिव्ह होऊ शकते. ब्रा जुनी झाली की, ती नीट स्वच्छ होत नाही. घामामुळे तयार होणारे बॅक्टेरिया आणि शरीरातील तेलाचा थर ब्रामध्ये जमा होते. यामुळे त्वचेचे संक्रमण वाढू शकते.
३) पोश्चर खराब होते
अनेकदा ब्रा जुनी झाल्यानंतर खूप सैल होऊ लागते. यामुळे स्तनाला योग्य सपोर्ट देता येत नाही. एकच ब्रा जास्त वेळ घातल्याने शरीराच्या पोश्चरवर वाईट परिणाम होतो. अनेक वेळा शरीर पुढे झुकू लागते, हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होते.
४) कंबर आणि खांद्यामध्ये सुरू होतात वेदना
जुनी ब्रा जास्त वेळ घातल्याने कंबर आणि खांदे दुखू लागतात. याचे कारण ब्राची फिटिंग खराब झालेली असते. यामुळे शरीराचा शेप बिघडतो आणि कंबर आणि खांद्याचा त्रास वाढतो.
५) स्तनाचा आकार होतो खराब
जुनी ब्रा घातल्याने स्तनाच्या आकारावर परिणाम होतो. स्तनाचा आकार बिघडतो. त्यामुळे स्तन विस्तारलेले दिसतात. याशिवाय, ते खूपच कुरूप दिसू लागतात.