लहानपणापासूनच आपण सर्वजण ऐकत आहोत की तुळस एक औषधी वनस्पती आहे. ज्यामुळे सर्व आजार बरे होतात. तुळस हा आयुर्वेदाचा सुवर्ण उपाय मानला जातो. या वनस्पतीची पूजा भारतात केली जाते आणि प्रत्येक भारतीय घरात तुळस असतेच. याची ताजी किंवा वाळलेली पाने वेगवेगळ्या डिशेसमध्ये वापरतात. पास्ता आणि सँडविच सारख्या दुसऱ्या देशातील रेसिपीजमध्येही याचा वापर केला जातो. पण या प्रसिद्ध असलेल्या तुळशीचेही बरेच दुष्परिणाम आहेत.
कोणी तुळशीची पानं खाणं टाळले पाहिजे?
१) गरोदर स्त्रियांनी
तुळस किंवा तुळशीचा प्रकार बेझील ही एक सुगंधित औषधी वनस्पती आहे. जी पुदीना वनस्पतींच्या लॅमिआसी प्रकारातून येते. त्यामुळे ती माता आणि त्यांच्या गर्भावर परिणाम करू शकते. टीओआयच्या अहवालानुसार हे गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरू शकते. जे धोकादायकही ठरू शकते.
२) मधुमेहाचे रुग्ण
पूर्वीच्या अनेक अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की तुळशी रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करू शकते. परंतु, जर कोणी आधीच यासंदर्भात औषधोपचार करीत असेल तर त्या व्यक्तीने तुळस आपल्या आहारात टाळावी. अहवालानुसार, यामुळे साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते.
शरीरावर तुळस काय परिणाम करते?
१) रक्त पातळ करणारे गुणधर्म
तुळशीत असे काही गुण आहेत जे आपल्या शरीरातील रक्त पातळ करू शकतात. जरी हा अॅलोपॅथीची औषधे घेऊ इच्छित नसलेल्या लोकांसाठी एक उत्तम घरगुती उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, तरीसुद्धा ज्या लोकांना आधीच अँटी क्लॉटिंग औषधे आहेत त्यांनी तुळस खाणे टाळावे.
२) यकृताचे नुकसान होऊ शकते
तुळशीमध्ये भरपूर युजेनॉल असतात. युजेनॉलचे जास्त सेवन केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते. तसेच मळमळ आणि जुलाबही होऊ शकतात.
३) दातांसाठी चांगले नाही
तुळशीची पाने चघळू नये. या मागे शास्त्रीय कारण असे आहे की त्यात मर्क्युरी (पारा) आहे ज्यामुळे तुमचे दात खराब होऊ शकतात. तुळशीची पाने अम्लीय स्वभावाची असतात. आणि आपले तोंड अल्कलाईन (क्षारयुक्त) आहे, ज्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात.