केसांची काळजी नीट योग्य पद्धतीने घेतली नाही तर केस गळायला सुरुवात होतात. तसेच सुंदर आणि चमकदार केस केवळ तुमचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर सर्वांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित करतात. केसांच्या सौंदर्यासाठी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. सुंदर आणि निरोगी केसांसाठी केवळ कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करणे पुरेसे नाही. आपल्याला माहीतच आहेत की, बाजारात अनेक कॉस्मेटिक उत्पादने उपलब्ध आहेत परंतु तुमच्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्व उत्पादने आवश्यक नाहीत. कॉस्मेटिक उत्पादने, केमिकल बेस शॅम्पू आणि कंडिशनर्सचेही तुमच्या केसांवर अनेक दुष्परिणाम होतात.
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केसांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या केसांना कोणत्या प्रकारची विशेष ट्रीटमेंट हवी आहे हे स्वतः ठरवू नका, तर त्वचारोग तज्ज्ञांना दाखवा किंवा क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार केसांची काळजी घ्या.
केसांची समस्या समजून घ्या
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने वापरतात. मात्र ही उत्पादने तुमच्या केसांची काळजी घेऊ शकत नाहीत. तुमच्या केसांना विशेष उत्पादने आणि विशेष दिनचर्या आवश्यक आहेत. केसांची गुणवत्ता ही अनुवांशिक आणि हार्मोनल घटकांवर अवलंबून असते. केवळ कॉस्मेटिक उत्पादने वापरणे तुमच्या केसांसाठी योग्य नाही.
तुम्हाला केस गळण्याची समस्या खूपच असेल तर नवीन उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी त्वचातज्ञांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा की प्रत्येकाचे केस वेगळे असतात आणि जर एखादे उत्पादन एका व्यक्तीसाठी प्रभावीपणे काम करत असेल, तर ते दुसऱ्यासाठी सारखेच काम करू शकेल असे नाही.
केसांची काळजी कशी घ्यावी
सूर्यप्रकाश, प्रदूषण, स्टाइलिंग, रंग आणि कॉस्मेटिक उत्पादने तुमच्या केसांना आधीच नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे अनेकजण कोणताही विचार न करता कॉस्मेटिक उत्पादने वापरतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात केसांचे नुकसान होऊ शकते.
बाहेर जाताना केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी केस स्कार्फने झाकून ठेवा.
तुमचे केस हिट मशीनने स्टाईल करण्यापूर्वी हीट प्रोटेक्टंट क्रीम किंवा सीरम वापरा. तसेच तुमच्या केसांवर सौम्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरा.
केसांचे पोषण करण्यासाठी केसांना गरम तेलाने मसाज करा. तसेच मॉइश्चरायझिंग हेअर मास्क वापरा.
ज्या लोकांना केस गळण्याची समस्या आहे, त्यांनी सॅटिनची उशी वापरा. रात्री झोपताना मऊ सॅटिन उशी तुमच्या केसांना इजा करणार नाही. सॅटिनच्या उशीवर झोपल्यास केसगळतीपासून सुटका मिळते आणि रात्री शांत झोपही लागते.
तुमच्या डोक्याची त्वचा ड्राय किंवा ऑयली असेल, तुमचे केस ड्राय किंवा ऑयली असतील तसंच तुम्हाला डॅंड्रफची समस्या असेल तर योग्य शॅम्पूची निवड केली पाहिजे. तसेच सतत शॅम्पू बदलू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानं शॅम्पू घ्यावा.