एक साधी रक्तचाचणी पहिल्या टप्प्यातील मधुमेह उलगडणार असल्याचे शास्त्रज्ञांनी नव्याने केलेल्या एका संशोधनातून सिध्द केले आहे.
पहिल्या टप्प्यात असलेला मधुमेहाची वाढ होवून तो दुसऱ्या टप्प्यामध्ये विकसीत होण्याआधीच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासून पुढील धोका टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. रक्तातील ग्लुकोजच्या वेगवेगळ्या चाचण्यांमधून रक्तातील ग्लुकोजची पातळी समजण्यास मदत होते. या संशोधनामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासण्यासाठी डॉक्टर रक्तातील ग्लिकेटेड हिमोग्लोबिन, किंवा ‘ए१सी’ स्तर चाचणी करतात.
रक्ताच्या ‘ए१सी’ स्तर चाचणीतून टाईप -२ मधुमेहाचे निदान होण्यास मदत होते. वजन वाढलेल्या व प्राथमिक पातळीवरील मदुमेहग्रस्तांना या चाचणीचा फायदा होणार असल्याचा दावा या संशोधनावर काम करणारे टेल इव्हिव विद्यापीठाचे वैद्यक शाखेचे संशोधक डॉ. नताली लर्नर यांनी केला आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यावर शरिरामध्ये ए१सी तयार होते. ही एक सामान्य चाचणी असल्याचे लर्नर यांनी सांगितले. या संशोधनावरील अहवाल युरोपीअन जर्नलमध्ये प्रकाशीत करण्यात आला आहे.