बाजारामध्ये त्वचेची, चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला हव्या तितक्या आणि वेगवेगळ्या प्रकरची उत्पादने सापडतील. तरीही आपण घरगुती उपायांना अधिक प्राधान्य देतो. असे करण्यामागे अगदी साधे कारण असू शकते. ते म्हणजे, बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारची रसायने वापरली जातात, ज्यांचा आपल्याला त्रास होऊ शकतो. मात्र घरगुती आणि नेहमीच्या वापरातल्या पदार्थांबद्दल आपल्या मनात अशी भीती नसते.

आपल्या स्वयंपाक घरात अनेक पदार्थ असतात, ज्यांचा वापर आपण आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी करू शकतो. साय, हळद, कोरफड, बेसन, मध इत्यादी पदार्थ त्वचेसाठी वापरले जातात हे सर्वांनाच माहित आहे. मात्र दिवसभरात सकाळ-संध्याकाळ प्यायला जाणाऱ्या चहाचासुद्धा आपल्याला वापर करता येतो. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. चहा पाण्याचा वापर कसा करावा आणि त्याचे त्वचेवर कोणते फायदे होतात पाहा.

Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा : Beauty tips : ‘या’ दहा सवयी घेतील तुमच्या त्वचेची योग्य काळजी; पाहा चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या सोप्या टिप्स

त्वचेला तजेला देण्यासाठी चहा पाणी कसे वापरावे?

चेहऱ्याची काळजी घेताना, अगदी आपण पितो तसा दूध घातलेल्या चहाचा इथे वापर करायचा नाहीये. केवळ कोऱ्या चहाच्या पाण्याचा वापर करावा.

१. चहाची निवड

ग्रीन टीमध्ये – अँटिऑक्सिडंट्स, ब्लॅक टीमध्ये – अँटीएजिंग, तर कॅमोमाइल टीमध्ये त्वचेला आराम देणारे घटक असतात. त्यापैकी तुम्हाला कोणत्या चहाची गरज वाटत आहे याचा अंदाज घेऊन, त्यानुसार चहा निवडावा. तुमच्या आवडीचा, इतर कोणत्याही प्रकारचा वापर करू शकता.

२. चहाचे पाणी तयार करणे

पातेल्यात कपभर पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये तुम्ही निवड केलेल्या चहाची पावडर किंवा टी बॅग घालून काही मिनिटे तसेच ठेवा. चहा मुरल्यानंतर तो गाळून थंड होऊ द्या.

३. चहा पाण्याचा वापर

सर्वप्रथम तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यासाठी तुम्ही एखाद्या क्लिन्झरचा वापर करू शकता किंवा पाण्याने तोंड धुवून मऊ टॉवेलने चेहरा पुसून घ्यावा.
त्यानंतर एखाद्या सुती कापडाचा तुकडा, तयार केलेल्या चहा पाण्यात बुडवून अतिरिक्त पाणी हलक्या हाताने पिळून काढून टाका.
आता ते कापड हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर फिरवावे. चेहऱ्यासोबत मानेवरदेखील चहाचे पाणी लावून घ्या. मात्र डोळ्याजवळ लावू नये.
काही मिनिटे चेहऱ्यावर पाणी तसेच राहू द्यावे. नंतर, हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होण्यास मदत होईल. ज्या भागावर मुरूम, किंवा कोरडेपणा असेल अशा ठिकाणी विशेष लक्ष द्या.
चहा पाण्यामध्ये असणाऱ्या घटकांचा त्वचेसाठी अधिक फायदा करून घ्यायचा असल्यास, काही काळासाठी ते पाणी चेहऱ्यावर तसेच राहू द्यावे. परंतु तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

हेही वाचा : नुसती कॉफी पिऊ नका, तर डोळ्याखालीसुद्धा लावा; काळी वर्तुळं घालवण्याच्या टिप्स पहा…

४. मॉइश्चरायझर

चेहऱ्यावरील चहाचे पाणी काही वेळानंतर टॉवेलने टिपून घ्यावे. त्यावर तुम्हाला आवश्यकता वाटत असल्यास, मॉइश्चराझरचा पातळ थर लावून तुमचे स्किन केअर संपवावे.

त्वचेवर चहा पाण्याचे होणारे फायदे पाहा

१. अँटिऑक्सिडंट घटक

चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे तुमच्या त्वचेला तजेला देणे, निरोगी ठेवण्यास मदत करतात.

२. अँटीइंफ्लेमेट्री घटक

तुमच्या त्वचेवरील चिडचिड, जळजळ कमी करण्यासाठी चहाचे पाणी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या त्वचेवर पुरळ, मुरुमं किंवा त्वचा संवेदनशील असल्यास चहाच्या पाण्याचा उपयोग करू शकता.

३. त्वचेचा एकसमान रंग

दररोज या घरगुती उपायाचा वापर केल्यास तुमचा त्वचेचा रंग एकसमान होण्यास मदत होते.

४. तजेला येणे

चहाच्या पाण्याचा वापर केल्याने नैसर्गिकरित्या त्वचेला आराम आणि तजेला मिळण्यास मदत होते. असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असल्याने, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

Story img Loader