तूप हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे हे आपल्याला माहित आहे. तुप टाकून वरणभात, पुरणपोळी, उकडीचे मोदक खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुपात तयार केला जणारा प्रसादाचा शिरा…म्हणजे अप्रतिमच. पूर्वी घरातच साजूक तूप बनवले जायचे आता विकतचे तूप खाण्याचे प्रमाण वाढले आहे. आजच्या काळातही तुम्ही घराच्या घरी खमंग साजूक तूप तयार करू शकता. सध्या आजींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये साजूक तूप कसे करायचे हे आजीबाई सांगत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये “घरच्या तूपाला तोड नाही.” असे म्हणज आजींनी साजूक तूप घरच्या घरी कसे तयार करावे हे सांगितले आहे.
१) दूध कडक तापवून घ्या. थंड होऊ द्या.
२)फ्रिजमध्ये ठेवल्यात चांगली घट्ट साय तयार होते.
३) साय एका भांड्यात काढून घ्या त्यात थोडेसे दही टाकून आंबवून घ्यावे.
४) दही लावलेली साय रवीने फेटून घ्यावी आणि त्याचे लोणी तयार करावे.
५) तयार लोणी स्वच्छ धूवून घेऊन त्याचे तूप कडवावे.
६) तुपातील बेरी लालसर होईपर्यंत कडवावे.
आजींनी तूप तयार करताना एक खास टीप देखील सांगितले आहे. आजी सांगतात की, तूपामध्ये थोडेसे मीठ टाकले तर तूप रवाळ होते. चिकट होत नाही.
हेही वाचा – रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून प्यायल्यास शरीराला मिळतील हे जबरदस्त फायदे
आजीबाईंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. vishwatejrpawar नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझी ९१ वर्षाची आजी घरच्या घरी तूप कसे तयार करायचे हे सांगते आहे. हे तूर दुकानातून विकत आणलेल्या तूपापेक्षा अत्यंत चविष्ठ असते .” व्हिडीओ लोकांना प्रंचड आवडला आहे. लोकांनी कमेंटस करून आजींच्या अनुभवाचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले, “आजींच्या सहज बोलण्यातून त्यांचा अनुभव जाणवतो” दुसरा म्हणाला, “खूप छान आजी” तिसरा म्हणाला,” खूप छान वाटल व्हिडीओबघून. साजूक तुपाची प्रक्रिया एका साजूक तुपा इतक्याच अस्सल आणि पारंपरिक व्यक्ति कडून”