बटाटा हा सर्वात सामान्य भाजीच्या प्रकारात मोडतो. भाजी करण्यासाठी काही नसेल तर घरात हमखास बटाटे हा पर्याय उपलब्ध असतो. आताच्या अनेक फास्ट फूडमध्येही बटाट्याचाच जास्त वापर केला जातो. बटाटे स्वस्त झाले कि हमखास जास्त आणून ते घरी साठवण्याचा आणि टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. पण यावेळी अनेकांना काही नेहमीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बटाटे व्यवस्थितपणे न साठवल्यास त्यांचा ताजेपणा कमी होतो, त्याला हळू हळू अंकुर फुटायला लागतात. अशावेळी काही सोप्प्या आपल्याला बरेच दिवस बटाटे टिकवून ठेवण्यासाठी काही सोप्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध चेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून काही टिप्स शेअर केल्या आहेत.
जास्त काळासाठी असे ठिकवून ठेवा बटाटे!
१. बटाटे थंड, हवेशीर ठिकाणी ठेवा.
२. फ्रिज सारख्या थंड तापमान असलेल्या ठिकाणी बटाट्याच्या स्टार्चचे साखरमध्ये रुपांतर होते. परिणामी शिजवल्यावर त्याला गोड चव येते आणि रंगहीनपणा दिसून येतो. त्यामुळे बटाटे जास्त थंड ठिकाणी ठेवायचे टाळा.
३. जास्त गरम किंवा जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणीसुद्धा बटाटे ठेवायचे टाळा. नेहमी कमी थंड आणि अंधार असेल अशा ठिकाणी ठेवा.
४. छोटी छोटी छिद्रे असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि कागदी पिशव्या या बटाट्याची शेल्फ-लाइफ वाढविण्याच्या उत्कृष्ट आहेत..
५. बटाटे साठवण्यापूर्वी धुऊ नका. ओलसरपणा तसाच राहिल्यामुळे ते लवकर खराब होतात..
६. बटाटाच्या त्वचेवरील हिरवा भाग म्हणजे सोलानिन नावाचे रसायन आहे. बटाटा जास्त सूर्यप्रकाशातराहिला तर ही नैसर्गिक प्रकिया होऊन हे रसायन त्यावर तयार होते.
७. सोलानिननमुळे कडू चव येते आणि तसे बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आजार होऊ शकतात.
७. जर बटाट्यावर थोडासा हिरवेपणा दिसत असेल तर शिजवण्यापूर्वी तो हिरवा भाग काढून टाका.
८. बटाट्याला अंकुर येणे हे बटाटा पुन्हा वाढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चिन्ह आहे. हवेशीर असलेल्या थंड, कोरड्या, गडद ठिकाणी बटाटे साठवल्यास अंकुर कमी येतात.
९. जर बटाट्यावर अंकुर आले असतील तर बटाटा शिजवण्यापूर्वी ते काढून टाका.
View this post on Instagram
सहज सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही बटाटे जास्त वेळासाठी साठवून ठेवू शकता.