How to polish wooden furniture at home? आता प्रत्येकाच्याच घरात थोडेफार का असेना पण लाकडी फर्निचर हमखास असतेच. हे फर्निचर जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केले तर ते दिर्घकाळ टिकते. म्हणूनच महिन्यातून ३ ते ४ वेळा त्याची व्यवस्थित स्वच्छता करणे, वर्षातून एकदा त्याला पॉलिश करणे गरजेचे ठरते. पण लाकडी फर्निचरला पॉलिशिंग करणे हे थोडे वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. आता तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल आणि त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा उपाय तुम्ही करून पाहू शकता. यामध्ये कमीतकमी पैशांत तुमचं फर्निचर अगदी पॉलिश केल्याप्रमाणे चकाचक चमकेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल हे एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लीनर आणि पॉलिशर आहे. लिंबाचा रस फर्निचरवरील माती आणि धूळ काढून टाकतो, तर ऑलिव्ह ऑइल त्याला चमकदार बनवतो. दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे मिश्रण मऊ कापडाने फर्निचरवर लावा आणि काही वेळाने पुसून टाका. फर्निचर बघा नवीनसारखं दिसू लागेल.

व्हिनेगर आणि पाण्याचा वापर

व्हिनेगर हा प्रभावी नैसर्गिक क्लीनर आहे. एक भाग व्हिनेगर आणि दोन भाग पाणी असं मिश्रण बनवा. या मिश्रणाने फर्निचर पुसा. हे मिश्रण फर्निचरवरील जुने डाग आणि मळ काढून टाकतं. यामुळे फर्निचरवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता ते स्वच्छ आणि नवीन दिसतं.

गरम पाणी आणि साबण

लाकडी फर्निचरवर हलकासा मळ बसलेला असेल, तर गरम पाणी आणि मऊ साबणाचा वापर करून तुम्ही तो मळ साफ करू शकता. साध्या कापडाने हे पाणी फर्निचरवर हलक्या हाताने लावा. यामुळे फर्निचर स्वच्छ होतं आणि त्याच्या चमकदारपणात भर पडते.

फर्निचर ओल्या कपड्याने साफ करू नका

लाकडी फर्निचरवरील बुरशी, डाग साफ करताना ओला कपडा वापरणे टाळा. यामुळे लाकडात जास्त पाणी शिरू शकते, ज्यामुळे ते फुगू शकते, रंग बदलू शकतो किंवा त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे लाकडी फर्निचरवर कधीही जास्त पाणी टाकू नका किंवा खूप ओले कापड वापरू नका. नेहमी सुक्या कापडाच्या साहाय्याने फर्निचर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. तसेच साफसफाई केल्यानंतर लगेच कोरड्या कापडाने सरफेस कोरडे करा.