पावसाळ्यात अनेकांना तेलकट त्वचेचा त्रास सतावतो. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्याने त्वचेवरील रोमछिद्रे ( skin pores) बंद होतात. यामुळे मुरूमांची समस्या वाढू लागते आणि आपला चेहरा काळवंडण्यासही सुरुवात होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात पावसाळाच्या दिवसात त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठीचे सोपे उपाय.
१) त्वचेवरील छिद्रांना अनलॉक करण्यासाठी व त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी दर आठवड्याला दिवसातून दोन वेळा नियमितपणे एक्सफोलिएट करत जावे, कारण याने तुमच्या त्वचेवरील छिद्र मोकळी होतात आणि तुमची त्वचा छान दिसते. आपल्या त्वचेला नियमित स्क्रबर ने स्वच्छ केल्याने त्वचेवरील घाण निघून जाते आणि छिद्रे मोकळे होतात. याने तुमची त्वचा एकदम खुलून दिसते.
2) तेलकट त्वचा स्वच्छ ठेवण्याकरिता तुम्ही कोरफड जेल किंवा इतर जेल, जे तुमच्या त्वचेला सूट करत असेल त्याचा वापर करावा. कारण जर तुम्ही कोणतीही क्रीम वापरली तर तुमच्या तेलकट चेहर्यावरील छिद्र बंद होतील आणि चेहर्यावर मुरूमांची समस्या उद्भवू शकते. नाजूक त्वचा असलेले क्लीन्सरद्वारे त्वचा स्वच्छ करू शकता. मात्र तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होतील अशीच प्रॉडकट वापरा.
३) टोनरसह तुम्ही चेहरा स्वच्छ करत असताना जर त्वचा जास्त कोरडी पडत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध असलेल्या अल्कोहोल-मुक्त टोनरसह आपली त्वचा स्वच्छ करा. याने तुमची त्वचा जास्त कोरडी न होता स्वच्छ होते. आणि चेहर्यावरील घाण व बॅक्टेरिया पुर्णपणे निघून जातात. एकीकडे योग्य पोषक तत्त्वांनी चेहर्याची त्वचा पुन्हा तजेल होते.
४) या ऋतूत तुमची त्वचा कोरडी पडणार नाही याचीदेखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. परंतु हे करत असताना ऑईल फ्री लोशन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. याने तुमची त्वचा कोरडी पडणार नाही आणि हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण मिळेल.
५) या दिवसांमध्ये आपले शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. तसेच आपली त्वचादेखील हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्याचबरोबर आपल्या आहारात फळांचे सेवन करावे. यामुळे तुमची त्वचा योग्य पोषण मिळते आणि चेहरा तजेलदार आणि चमकदार दिसतो.
६) एखाद्या कार्यक्रमानंतर घरी आल्यावर काहीवेळा असे होते की, कंटाळा आल्याने महिला मेकअप न काढताच झोपायला जातात. असे वागणे आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. रात्री झोपायच्या आधी नारळ तेल किंवा क्लीन्सर वॉटर वापरुन मेकअप काढावा. यानंतर हलक्या फेसवॉशने चेहरा धुवावा, असे केले नाही तर कालांतराने आपला चेहरा निस्तेज दिसेल. हे टाळण्यासाठी आपण वेळोवेळी चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करणे महत्वाचे आहे.
टीप : सदर टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा अथवा स्किन स्पेशलिस्टचा सल्ला अवश्य घ्या.