हिवाळ्यामध्ये वातावरण अतिशय थंड असते. त्यामुळे आपण बरेचदा पलंगामध्ये, पांघरूणात गुरफटून पडून राहणे पसंत करतो. मात्र, ही थंडी आपल्यासोबत सर्दी-खोकल्यासारखे हलके आजार घेऊन येते. या दरम्यान आपली हाडे आणि सांधे आखडण्याच्या समस्या उद्भवतात. अशावेळेस प्रत्येकाला सकाळी उठून व्यायाम करणे जमेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये थोडे बदल केल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरू शकते. आहारात योग्य बदल केल्याने विनाकारण येणारी सुस्ती, आळस, थकवा दूर होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचे वजनदेखील नियंत्रित राहू शकते.

यासाठी तुमच्या आहारात जर थंडीच्या दिवसांमध्ये येणाऱ्या फळांचा समावेश केलात तर त्यामधून मिळणारी जीवनसत्वे, फायबर, खनिजे यांसारखे घटक शरीरसाठी उपयुक्त ठरू शकतात; अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या लेखामधून समजते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हिवाळ्यात ही सहा फळे खाणे फायदेशीर ठरू शकतात

१. संत्री

संत्र या फळामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यासाठी डिटॉक्स म्हणून याचा उत्तम वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे संत्र वजन नियंत्रित ठेवण्याकरिता उपयुक्त ठरू शकते. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम, खनिज यांचे प्रमाण जास्त असून कॅलरीजचे प्रमाण कमी असते. म्हणून संत्री खाल्ल्याने पचनास मदत होऊन, पोट अधिक काळ भरल्यासारखे राहते.

हेही वाचा : थंडीच्या दिवसांत गाजर ठेवेल वजनावर नियंत्रण! पाहा काय आहेत तज्ज्ञांनी सांगितलेले गाजराचे फायदे आणि गुणधर्म….

२. डाळिंब

डाळिंब या फळामध्ये फायबर, खनिज आणि अँटिऑक्सिडंट्स भरभरून असतात. त्यासोबतच, या फळात कॅलरीज कमी असतात. तुम्ही या फळाचे सेवन व्यायामाआधी किंवा व्यायामानंतर करू शकता.

३. सफरचंद

सफरचंद आपल्याला बाजारामध्ये केव्हाही उपलब्ध होणारे असे फळ आहे. सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचन चांगले होण्यासाठी, सोबतच पोट अधिक काळासाठी भरलेले राहण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांच्यासाठी रिकाम्या वेळेत किंवा अवेळी काही खावेसे वाटत असल्यास सफरचंद खाणे उपयुक्त ठरू शकते.

४. किवी

किवीमध्ये प्रचंड प्रमाणात पौष्टिक घटक असून, यात क जीवनसत्वे, के जीवनसत्वे, फायबर असतात. कॅलरीजचे प्रमाण कमी असते. आतमधून हिरवे दिसणारे हे आंबटसर फळ एखाद्या सॅलेडची चव आणि पौष्टिकता वाढवण्याचे काम करत असते.

५. पेरू

पेरू या फळाला प्रचंड गर असून, त्यामध्ये प्रथिने आणि फायबरदेखील भरपूर असतात. त्यामुळे केवळ एखादा पेरू खाल्ल्यानेही पोट बऱ्याचवेळासाठी भरलेले राहते. वजन कमी करताना पेरू खाणे उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा : सकाळपासून रात्रीपर्यंत राहाल प्रचंड उत्साही; रिकाम्यापोटी केवळ ‘हे’ पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर, टिप्स पाहा…

६. सीताफळ

चवीला अतिशय गोड लागणारे फळ केवळ चवीत सर्वोत्तम नसून, त्यामध्ये पौष्टिक घटकांची रेलचेल असते. यामध्ये अ आणि क जीवनसत्त्वे, काही प्रमाणात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यांसारखे घटक आढळत असल्याची माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखानुसार मिळते. हिवाळ्यामध्ये अनेकदा आपले पोट साफ न झाल्याची तक्रार असते. अशा वेळेस फायबरयुक्त सीताफळ खाणे फायदेशीर ठरू शकते.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

Story img Loader