तुमच्या कोमेजलेल्या आणि रॅशेस आलेल्या त्वचेला पुन्हा टवटवीत करण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन अनेक ब्युटी ट्रीटमेंट कराव्या लागतात. यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, घाईच्या वेळेत हे सर्व करणे शक्य नसते. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या थकलेल्या चेहऱ्याला टवटवीत करू शकणाऱ्या या खास टिप्स…

गुलाब पाणी
गुलाब पाणी म्हणजेच रोज वॉटरमध्ये त्वचा हायड्रेट आणि तजेलदार करण्याचा गुणधर्म असतो. कापसाचे लहान लहान गोळे गुलाब पाण्यात भिजत घालून त्याने चेहरा साफ करावा. गुलाब पाण्याने चेहरा साफ केल्याने चेहरा टवटवीत वाटतो. याशिवाय, गुलाबाच्या सुगंधामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते आणि थकवा दूर होतो.

how to make natural lip balm at home
Home Made Lip Balm : थंडीने ओठ फाटलेत? मग १० मिनिटांत बीटापासून बनवा लिप बाम; वाचा, सोपी पद्धत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच
Kairiche Lonche recipe,
१५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Start your day with theory of shake it off
Stress Reliever : तणाव दूर करण्यासाठी ही थिअरी करेल तुम्हाला मदत; दिवसातून दोन ते तीन मिनिटे करा ‘ही ‘गोष्ट, वाचा, डॉक्टरांचे मत
makeup hacks how long can you wear makeup
Makeup Hacks : चेहऱ्यावर किती तास मेकअप ठेवणे सुरक्षित? त्वचेला हानी पोहोचू नये यासाठी काय करावे? जाणून घ्या
how to keep chapati soft
तुम्ही बनवलेल्या पोळ्या कडक होतात? अहो, मग ‘या’ सोप्या टिप्सने बनवा लुसलुशीत पोळ्या
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?

मधाचा फेसपॅक
मधामधील ब आणि क जीवनसत्व त्वचेसाठी फायद्याचे असते. मधाचे काही थेंब हातावर घेऊन फेसवॉशप्रमाणे चेहऱ्याला लावून थंड पाण्याने तोंड धुतल्यास ताजेतवाने वाटते. मधामुळे चेहऱ्यावर आलेली मरगळ लगेच गायब होते. त्वचेला ग्लो (तजेलदारपणा) आणण्यासाठी दही आणि मधाचे मिश्रण करुन ते पाच मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. अवघ्या पाच मिनिटांमध्ये चेहऱ्यावर आलेला तजेलदारपणा लगेच दिसून येतो.

लिंबाचा फेसवॉश
लिंबाचा फेसवॉश त्वचेला फ्रेश करतो. त्याचबरोबर लिंबाच्या सुगंधामुळे दिवसभर टवटवीत वाटते.

पेट्रोलियम जेली
डोळ्यांच्या पापण्यांपासून वर आणि गालावर पेट्रोलियम जेली लावल्याने फ्रेश झाल्यासारखे वाटते. पेट्रोलियम जेलीमुळे चेहरा चमकदार आणि फेशीयल केल्याप्रमाणे ताजातवाना दिसतो.

कॉफीचा फेसपॅक
कॉफी चेहऱ्याला लावल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. कॉफीमुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डार्क लाईन कमी होतात.

बर्फाचा तुकडा फिरवणे
बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर फिरवा. त्यामुळे चेहरा फ्रेश होतो. रुमालामध्ये बर्फाचा तुकडा बांधून तो चेहऱ्यावरून फिरवल्यावर काळवंडलेला चेहरा टवटवीत होतो.

Story img Loader