उन्हाळाच्या दिवसात तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग वापरून पाहिले असतील. त्याचवेळी काही असे फेस पॅक वापरून तुम्ही तुमची त्वचा सुरक्षित आणि सुंदर ठेवू शकता. काही नैसर्गिक आणि घरगुती फेसपॅक जे तुमच्यासाठी उन्हाळ्यात खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला अशाच काही पॅकबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरफड आणि लिंबाचा रस

कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच त्वचेची आर्द्रता टिकून ठेवण्यास देखील मदत होते. दुसरीकडे लिंबाचा रस त्वचेवरील ऑइल काढून टाकण्यास मदत करतात. त्यांचा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे कोरफड जेल आणि २ चमचे लिंबाचा रस घेऊन त्याची पेस्ट बनवा. पेस्ट बनवल्यानंतर हा पॅक २० मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहर्‍यावरील पॅक काढण्यासाठी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टरबूज आणि दही

दही ही तुमच्या त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते, तर टरबूज त्वचा थंड ठेवते. या दोन्ही गोष्टी एकत्र वापरणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आता चेहर्‍यावर याचा फेस पॅक लावण्यासाठी सर्वात आधी टरबूज आणि दह्याची पेस्ट तयार करा, त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहर्‍यावर लावून २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर हा पॅक काढण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुवा. सनबर्न झालेल्या त्वचेला बरे करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

चंदन आणि गुलाब पाणी

स्टाइल क्रेझनुसार, गुलाबपाणी तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यास खूप मदत करते. गुलाब पाण्याच्या वापराने त्वचेची चमक वाढते. दुसरीकडे चंदन त्वचेला थंड ठेवण्यासाठी खूप मदत करते. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिसळा. यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा. पेस्ट पूर्णपणे सुकल्यानंतरच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

दूध – मध फेस पॅक

उन्हाळ्यात जर त्वचा चमकदार आणि मऊपणा हवा असेल तर दूध आणि मध मिसळून चेहर्‍यावर लावण्यासाठी फेसपॅक तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. त्यात हा पॅक कोरड्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे, यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल. त्यात हा नैसर्गिक पॅक लावल्याने तुमच्या त्वचेला दुष्परिणामांपासून संरक्षण करतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)