रोजच्या व्यस्त शेड्युलमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे कठीण असते. त्यातही सर्वात जास्त दुर्लक्ष शरीराकडे होते. त्यात जर चेहऱ्याच्या त्वचेची नीट काळजी घेतली नाही, तर त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यावर उपचार करण्यासाठी अनेकवेळा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सचा आधार घेतला जातो. पण त्यामुळेही काहीवेळा मदत मिळत नाही. अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी तुम्ही काही सोपे टिप्स वापरू शकता. कोणत्या आहेत या टिप्स जाणून घ्या.

टोनर
टोनर चेहऱ्याच्या त्वचेचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कॉटन पॅडबरोबर तुम्ही टोनरचा वापर करू शकता, ते हळूहळू चेहरा आणि मानेवर लावा. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक पीएच पातळीमध्ये समतोल राखला जातो.

Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

आणखी वाचा : लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; पाहा यादी

ब्युटी प्रोडक्ट्स
अनेक महिलांना झोपण्यापुर्वी कोणतेतरी ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याची सवय असते पण यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. झोपल्यावर त्वचेतील पौअरस म्हणजेच छिद्र उघडतात पण झोपण्यापूर्वी ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने हे छिद्र बंद होऊन त्वचेचे नुकसान होऊ शकते.

केस
अनेक महिलांना रात्री केस खुले ठेऊन झोपण्याची सवय असते. पण यामुळे केसातील तेल किंवा धुळीचा चेहऱ्यावर परिणाम होऊन, पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.