प्राचीन काळापासूनच आपण जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी कडीपत्त्याचा वापर करत आहोत. औषधी गुणांनी समृद्ध असलेला कडीपत्ता फक्त जेवणासाठीच वापरला जात नाही तर यामुळे अनेक आजार देखील बरे होतात. कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. याचा वापर केल्याने त्वचा तेजस्वी होते सोबतच मुरुमांचा त्रास देखील दूर होतो. व्हिटॅमिन ए आणि सीने भरपूर असलेला कडीपत्ता खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असलेल्या कडीपत्त्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. जाणून घेऊया त्वचेसाठी अनेक गुणधर्मांनी समृद्ध कढीपत्त्याचे काय फायदे आहेत.

हळद आणि कडीपत्त्याचा फेसपॅक :

हळद आणि कडीपत्ता हे दोन्ही अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध आहेत. या दोन गोष्टींचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांपासून सुटका होईल.

Health Tips : त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे Tea Tree oil; ‘या’ समस्यांपासून करते रक्षण

फेसपॅक तयार करण्याची विधी :

६ ते ७ कडीपत्त्याची पाने आणि ४ ते ५ चमचे कच्ची हळद घ्यावी. थोडं पाणी घालून हे एकजीव करावे. ही पेस्ट एका वाटीमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस घालावा. घट्ट होईपर्यंत मिसळा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावावी. १० मिनिटानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवावा. चेहरा धुतल्यावर त्यावर मॉइश्चरायझर किंवा नारळाचे तेल लावावे. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील केस कमी होण्यास, चेहऱ्यावर जमा झालेले तेल कमी होण्यास मदत होईल.

केसांची वाढ वाढवण्यासाठी कढीपत्ता पॅक:

लोह, फॉलिक अ‍ॅसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी, ए आणि व्हिटॅमिन ई समृद्ध, कढीपत्ता केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे टाळू निरोगी राहते आणि केस मुळांपासून मजबूत होतात.

कढीपत्ता आणि खोबरेल तेल पॅक तयार करण्याची विधी :

खोबरेल तेलात कढीपत्ता टाकून गॅसवर थोडा वेळ गरम करा. तेल गाळून केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तासभर केसांमध्ये तेल राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. हा पॅक लावल्याने केसांची वाढ होईल.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)