सूर्याच्या हानिकारक अतिनील किरण तुमच्या त्वचेला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत त्वचेवर टॅनसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. टॅनिंगमुळे त्वचेचे सौंदर्य काही दिवस नाहीसे होते, जे नैसर्गिकरित्या ठीक करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. तुम्ही होममेड डी टॅन फेस मास्क कसा बनवू शकता आणि ब्लीच किंवा रासायनिक उत्पादनांऐवजी घरगुती उत्पादने वापरून तुमची त्वचा टोन कशी सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊयात…..

होममेड डी टॅन फेस मास्क

कोरफड जेल

डी टॅन फेस मास्क बनवण्यासाठी, जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी त्वचेवर कोरफड जेल लावले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुतले तर तुमच्या त्वचेची टॅनिंग हळूहळू कमी होईल. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक अॅसिड, कोलीन, बी१, बी२, बी३ आणि बी६ आढळतात. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन बी १२ देखील असते आणि या सर्व गोष्टी मिळून त्वचा सुधारण्यास मदत करतात.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Spinach or Palak benefits in hair growth and prevent hairfall Why Spinach Is The Secret To Healthier, Fuller Hair
केस लांब हवे, पण केसगळती थांबतच नाही? फक्त एक महिना आहारात पालकचा समावेश करा

मध

तुम्ही डी टॅन मास्क म्हणून मध देखील वापरू शकता. मधामध्ये फ्रक्टोज तत्व आढळते, जे त्वचेची ही समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी आणि अमिनो अॅसिडही त्यात आढळतात. ते वापरण्यासाठी तुम्ही दोन चमचे दही एक लहान चमचा मधात मिसळा. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे सोडा. आता कोमट पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामांसाठी हे दररोज करा.

टोमॅटो

उन्हाळाच्या दिवसात चेहरा खूपच टॅन झाला असेल तर टोमॅटो मॅश करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर चांगली लावा. १५ मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पद्धत पुन्हा करा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होऊन त्वचा उजळ आणि चमकदार होईल.टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-के असते. याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर आणि नियासिन यांसारखे पोषक घटकही टोमॅटोमध्ये आढळतात.