Beauty Tips: पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे चेहरा नेहमी स्वच्छ करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात अनेक प्रकारच्या संसर्गामुळे त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेच्या छिद्रांत घाण अडकणार नाही, याची काळजी घ्या. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा. शरीराला विषारी पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, जेणेकरून मुरुम येणार नाहीत. पाण्याची कमतरता करु नका.
पुढीलपैकी जो फेसपॅक तुम्हाला अधिक सोयीस्कर, सोपा वाटेल तो करून बघा.
या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रकारची उत्पादनं सहज मिळतात. परंतु ही सर्व उत्पादने महाग आहेत तसेच हानिकारक रसायनांनी समृद्ध आहेत जी आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मॉन्सून स्पेशल फेस पॅक
- त्वचा काळवंडली असेल तर हा एक उपाय करून बघा. दही, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं सम प्रमाणात घ्या. चेहरा थोडा ओलसर करा. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चेहरा चोळा. यामुळे त्वचेवरचा मळ निघून जाईल. काळवंडलेपणा दूर होईल आणि त्वचा स्वच्छ दिसू लागेल.
- पपईचा गर आणि चंदन पावडर हा एक आणखी छान आणि सोपा उपाय आहे. पपईमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ए तसेच चंदनाची शितलता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे त्वचेचे खूप छान पोषण करतात.
- सगळ्यात पहिला फेसपॅक म्हणजे चंदन आणि गुलाब पाणी. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिक्स करा आणि त्याचा लेप त्वचेवर लावा. हा लेप सुकला की चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पिंपल्सचा त्रास होत असल्यास हा उपाय खूपच गुणकारी ठरतो.
- त्वचा टाईटनिंगसाठी हा उपाय चांगला आहे. यासाठी मुलतानी माती काकडीचा रस टाकून भिजवा आणि चेहऱ्यावर लावा. सुकेपर्यंत हा लेप चेहऱ्यावर राहू द्या. त्वचेचा सैलसरपणा कमी होऊन त्वचा अधिक तरुण दिसू लागेल.
- त्वचेवर ग्लो आणण्यासाठी हळद आणि मध एकत्र करून लावलेला फेसपॅक अधिक उपयुक्त ठरेल.
- टोमॅटो सध्या महागले आहेत मात्र, टोमॅटोमध्ये असणारे घटक चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. हा उपाय करण्यासाठी १ टेबलस्पून टोमॅटोचा रस, १ टीस्पून मध आणि २ टीस्पून गुलाब पाणी हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. ५ ते ७ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
हेही वाचा – आंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणे चुकीचे की बरोबर? होऊ शकते ‘हे’ नुकसान
- लिंबाचा रस त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. म्हणूनच लिंबाचा रस, दही आणि मध हे एक सुपर कॉम्बिनेशन लावून बघा.