Skin Care Routine : पावसाळ्यात त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा चेहऱ्यावर अनेक मुरुम येतात किंवा चेहरा खूप तेलकट दिसू लागतो. बऱ्याचदा डेली हेल्थी स्कीन रुटीन फॉलो करत त्वचेची योग्य काळजी घेऊनही चेहऱ्यावर मुरुम येतात. याचा अर्थ तुम्ही काळजी घेताना कुठेतरी चुकत आहात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येण काही थांबत नाही. अशावेळी तुम्ही त्वचेची काळजी घेताना कुठे चुकत आहात आणि मुरुपांपासून कशी मुक्तता मिळवायची जाणून घ्या.
१) त्वचेवर चुकीचे केअर प्रोडक्ट्स वापरणे
स्कीन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी, आपली त्वचा तेलकट, कोरडी किंवा सामान्य यापैकी कोणती आहे हे नीट तपासून घ्या. जर तुम्ही त्वचेनुसार चुकीचे स्कीन प्रोडक्ट वापरत असाल तर तुमची त्वचा खराब होऊ शकते. तसेच चेहऱ्यावर मुरुम येऊ लागतात.
२) हानिकारक मेकअप प्रोडक्ट वापरणे
मेकअप प्रोडक्ट चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जातात. पण मेकअपचे अनेक प्रोडक्ट बाजारात आहेत ज्यामध्ये केमिकलचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे चेहऱ्यावर बराच वेळ मेकअप ठेवल्याने योग्य ऑक्सिजन मिळत नाही यामुळेही चेहऱ्यावर मुरुम येतात.
३) चेहऱ्यावर चुकीचे क्लींझर वापरणे
चेहऱ्याच्या त्वचेनुसार योग्य क्लींझरची निवड करणे देखील खूप महत्वाचे आहे, अन्यथा चेहऱ्याची त्वचा खराब होऊ शकते. तुम्ही फोम क्लींझर वापरू नका, तसेच स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी क्लींझर वापरू नये. असे केल्याने त्वचेला भोगा पडण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळवायचा असेल, तर फक्त वॉटर बेस्ड क्लींझर लावा.
४) फक्त वाइप्सच्या मदतीने मेकअप काढा
चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी वाइप्सचा वापर करा, पण त्यानंतर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फेसवॉश वापरू शकता. कारण यामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे केमिकल्स निघून जातील.