वातावरणातील गारवा हळूहळू कमी होऊ लागला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेला मॉइश्चरायझर, फेसपॅक वगैरे लावून चेहरा, त्वचा कोरडी पडू नये यासाठी काळजी घेत असतो. मात्र आता हवेतील उष्णता वाढू लागली आहे. लवकरच उन्हाळा सुरु होईल. अशा वातावरणात सूर्य किरणांचा , धूळ, प्रदूषणाचा चांगलाच परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. मात्र सर्व आपण चेहरा तुकतुकीत ठेवण्यासाठी, उजळ राहण्यासाठी वेगवेगळ्या फेसमॅस्क, फेसपॅक इत्यादींचा वापर करतो. परंतु आपल्या नाकाकडे मात्र आपण तेवढे लक्ष देत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे सर्व धूळ, घाण आपल्या नाकाच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा होते. परिणामी आपले नाक हाताला खरखरीत जाणवते. त्यावर काळ्या रंगाचे बारीक-बारीक ठिपके पाहायला मिळतात. त्यालाच आपण ब्लॅकहेड्स म्हणतो. आता नाकावरचे हे चिवट ब्लॅकहेड्स कसे काढायचे, तसेच त्यातही घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करायचा त्याच्या टिप्स इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केल्या आहेत, त्या पाहू.

हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावरील पिंपल काही केल्या जाईना? ‘या’ पाच आयुर्वेदिक गोष्टी करतील तुमची मदत…

ब्लॅकहेड्स काढायच्या ३ टिप्स पाहा :

१. चेहऱ्यावर वाफ घेणे

एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळून घ्यावे.
पातेल्यातील पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर त्यामध्ये थोडासा कापूर घाला.
आता डोक्यावरून एखादी चादर, स्कार्फ किंवा मोठा रुमाल घेऊन पातेल्यातील पाण्याची वाफ चेहऱ्यावर घ्या.
ही क्रिया २० मिनिटांनंतर पुन्हा एकदा करा.

२. बेकिंग सोडा मास्क

एक छोटा चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्या.
दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याची एक पेस्ट तयार करा.
ही पेस्ट १५ ते २० मिनिटांसाठी नाकावर लावून ठेवा.
नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

हेही वाचा : लिपस्टिक, आयलायनर की आयशॅडो? Valentine day साठी हे तीन मेकअप लूक पाहा…

३. लिंबू, मध आणि साखरेचा मास्क

एक चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध आणि १ चमचा साखर एका बाउलमध्ये घ्या.
सर्व पदार्थ नीट मिसळून घ्या.
तयार झालेला मास्क किंवा मिश्रण नाकावर एकसमान लावून ठेवा.
३० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.

४. ओटमील स्क्रब

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थोडेसे ओटमील आणि थोडे दूध घालून त्याची पेस्ट बनवून घ्या.
तयार ओटमील स्क्रब संपूर्ण चेहऱ्यावर लावून छान मसाज करा. विशेषतः नाकाला स्क्रब करावा.
चेहऱ्यावर लावलेला ओटमील स्क्रब थोड्यावेळाने पाण्याने धुवून टाका. अथवा तुम्हाला लगेच धुवून टाकला तरी चालेल.

हेही वाचा : Skin care tips : चेहरा दिसेल चमकदार अन उजळ; चहाचा ‘अशा’ पद्धतीने करून पाहा वापर…

घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून हे मास्क बनवून आणि वापरून पाहा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या स्किन केअर व्हिडिओला आत्तापर्यंत ४.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin care routine to get rid of blackheads from nose at home make these for diy mask dha