Skin Icing Benefits : प्रत्येकाला स्वत:चा चेहरा प्रिय असतो. चेहरा तजेदार ठेवण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात. चेहऱ्यावर डाग, मुरुम व पुटकुळ्या येऊ नये, म्हणून काळजी घेतात.चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी लागते.
तुम्हाला माहिती आहे का, चेहऱ्यावर बर्फ लावणे किती फायदेशीर आहे? होय. चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये नियमित चेहऱ्यावर बर्फ घासण्याचे फायदे सांगितले आहे.
पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे –
- चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या कमी होतात.
- हेल्दी ग्लोइंग त्वचेसाठी रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.
- बर्फ चेहऱ्यावरील जळजळ सुद्धा कमी करण्यास मदत करते.
- चेहऱ्यावर बर्फ घासल्याने पुरळ आणि डाग कमी होतात.
anasaabeautyhq या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली असून या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम सुद्धा कमी होऊ शकतात” या पोस्टवर काही युजर्सनी स्किन केअर संदर्भात प्रश्न सुद्धा विचारली आहेत.