Morning Skincare Routine: सकाळी उठल्यानंतरचे स्किन केअर रुटीन प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो, त्यानुसार त्याची काळजी घेणे गरजेचे असते. आपण चेहरा धुताना कोणते पाणी वापरतो याचादेखील त्वचेवर परिणाम होतो, हे बऱ्याच जणांना माहित नसते. सकाळी चेहरा धुताना थंड आणि गरम पाण्यापैकी कोणत्या पाण्याचा वापर करावा जाणून घ्या.
चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे
चेहरा धुताना गरम आणि थंड पाण्याचा वापर केला जातो. पण गरम पाण्याचा वापर केल्याने कधीकधी त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःच बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. यावेळी त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल आणि अस्वच्छ घटक जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा सकाळी आपण पाण्याने चेहरा धुतो याचा थेट परिणाम या चित्रांवर होतो जर गरम पाण्याने चेहरा धुतला तरी सेन्सिटिव्ह पोअर्स म्हणजेच चेहऱ्यावरील छिद्रांचे नुकसान पोहचु शकते.
आणखी वाचा: सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर
थंड पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर मानले जाते. थंड पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल आणि त्वचेचा पीएच योग्य राहतो. याउलट गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेची पीएच पातळी बिघडू शकते. तसेच पिंपल्स, ऍकने यावरही थंड पाणी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे सकाळी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने चेहरा धुण्यास सांगितले जाते.