Skin Care Tips : खाण्यापिण्यात निष्काळजीपणा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. यामुळे रोज अनेक लहान- लहान समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. यापैकीच एक समस्या म्हणजे मुरुम. जी सामान्यत: जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि त्वचेमध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे उद्धवते. पण मुरुमांच्या समस्येबाबत आणखी एक कारण समोर आले आहे. जे तुमच्या सवयीशी संबंधित आहे. हे कारण कोणते आणि त्यामुळे ही समस्या कशी वाढते जाणून घेऊ…

त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. गीतिका गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आंघोळीनंतर ब्रश केल्याने मुरुमांची समस्या वाढते अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आंघोळीनंतर ब्रश केल्यास वाढते मुरुमांची समस्या?

त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. गीतिका गुप्ता यांच्या माहितीनुसार, आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा आपल्या तोंडातून त्वचेवर बॅक्टेरिया जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया चेहऱ्याच्या त्वचेवर विशेषत: हनुवटीभोवती किंवा ओठांच्या बाजूच्या त्वचेवर राहतील आणि परिणामी मुरुमांची समस्या वाढू शकते.

आंघोळीनंतर ब्रश करणे आणि मुरुम यांचा काय संबंध आहे?

डॉक्टरांच्या मते, मुरुम हे मुख्यत्वे जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया या कारणांमुळे येतात. अशा परिस्थितीत दात घासताना बॅक्टेरिया आपल्या तोंडातून त्वचेवर हस्तांतरित होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. यामुळेच आंघोळीपूर्वी ब्रश करण्याची शिफारस केली जाते, जेणेकरून ब्रश करताना हनुवटीवर किंवा त्याच्या सभोवतालच्या भागावर असलेले कोणतेही बॅक्टेरिया टूथपेस्ट करताना धुतले जाऊ शकतात, ज्यामुळे त्वचेवरील घाण कमी होते आणि पुरळ येण्याचा धोका कमी होतो.

निरोगी त्वचेसाठी फॉलो करा ‘या’ ३ चांगल्या सवयी

१) हात स्वच्छ ठेवा

आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करा, असे केल्याने तुम्ही चेहऱ्यावरील बॅक्टेरियाचे प्रमाण कमी करू शकता.

२) तोंड स्वच्छ धुवा

दात घासल्यानंतर तुमच्या तोंडाभोवती उरलेली टूथपेस्ट काढून टाकण्यासाठी तोंड पूर्णपणे स्वच्छ धुवा. यासाठी तोंडात पाणी भरून चुळ भरून थुका.

३) चेहऱ्याची नीट काळजी घ्या

तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाण आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी चेहऱ्याच्या स्वच्छतेची नीट काळजी घ्या.

Story img Loader