उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे पायांचे सौंदर्य झपाट्याने नष्ट होऊ लागते. पायाची त्वचा निस्तेज आणि टॅनिंगने भरलेली असताना, पायावर चप्पल लागण्याच्या खुणा, टाचेला भेगा पडणे इत्यादी पायांचे सौंदर्य हिरावून घेतात. यासाठी आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात, ज्यामुळे पाय खराब दिसू शकतात.
जर तुम्हाला तुमच्या पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार दिसावी असे वाटत असेल, तर तुम्ही काही गोष्टी करू शकता. आज आपण अशा टिप्स जाणून घेऊया, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पाय सुंदर बनवू शकता. यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. तुम्ही हे घरी सहज करू शकाल.
तुमचा जोडीदार करत आहे तुमच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न? ‘या’ तीन टिप्सच्या मदतीने करा खात्री
अशा प्रकारे घ्या पायांच्या त्वचेची काळजी
नखांच्या बुरशीवर उपाय :
अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्यात पाय घालून २०-३० मिनिटे बसा. यानंतर, टॉवेलच्या मदतीने पाय कोरडे करा आणि लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब नखांवर टाकून मालिश करा. रात्रीच्या वेळी असे केल्यास चांगले होईल.
एक्सफोलिएशन आवश्यक :
पायाची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा गुलाबजल १ चमचा साखरेत मिसळा आणि स्क्रब तयार करा. याने पायाला चांगले मसाज करा. मृत त्वचा निघून जाईल.
Office Wear Ideas: ऑफिसमध्ये स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
फूट मास्क बनवा :
पायांची त्वचा उजळ करण्यासाठी, २ चमचे भोपळ्याच्या पेस्टमध्ये पाव चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा दही मिसळा. धुतलेल्या पायावर लावा आणि अर्धा तास सोडा. यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतील.
टाचांवरील भेगा दूर करा :
टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्री तुरटी आणि मिठाच्या पाण्यात पाय भिजवून २० मिनिटे बसा आणि नंतर ते कोरडे करा. त्यानंतर टाचांवर क्रॅक क्रीम, खोबरेल तेल इत्यादी लावा.
पायाचे मालिश आवश्यक :
पायाच्या चांगल्या मसाजने केवळ वेदना, अस्वस्थता, थकवा इत्यादी दूर होत नाहीत, तर पायही सुंदर होतात.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)