उन्हाळा सुरू झाला असून प्रत्येकाला कडक ऊन आणि उष्णता टाळायची असते, म्हणून या दिवसात कामाशिवाय घरी राहून हे टाळता येते, पण काही कामानिमित्त बाहेर जावे लागले तर कडक उन्हाचा आपल्याला सामना करावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही लोकं तीव्र सूर्यप्रकाशामुळे सनबर्नची तक्रार करतात, तर काही लोकांना लाल पुरळ येऊ लागतात. तसेच जर बाहेर जाणे खूप महत्वाचे असेल तर घरातून बाहेर पडताना काही आवश्यक वस्तू सोबत ठेवाव्यात. घरातून बाहेर पडताना कोणकोणत्या वस्तू सोबत ठेवाव्यात ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सहसा छत्री, हातमोजे आणि स्कार्फ वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून कडक उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण करता येईल. यासोबतच घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन क्रीम लावा, ज्यामुळे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होऊ शकते.

भरपूर पाणी प्या

नितळ त्वचा मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी पिणे कारण पाण्यामुळे शरीरात आणि त्वचेचे हायड्रेशन वाढते. दिवसातून कमीत कमी ६ ते ७ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच त्वचा घट्ट आणि चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेच्या पेशी चांगल्या प्रकारे काम करतात आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात.

हंगामी फळांचे सेवन करा

उन्हाळ्यात शरीराला अधिकाधिक पाण्याची गरज असते. अशा परिस्थितीत काकडी, टरबूज इत्यादींचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खरं तर, काकडीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिलिका यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्वचा आणि केसांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

झोपण्यापूर्वी करा हे काम

यासोबतच दररोज उन्हातून आल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी बेसन, हळद पावडरमध्ये दूध किंवा मलई मिसळून पेस्ट तयार करा.

आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. १० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि उन्हाळ्यात त्वचा चमकदार होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin care tips take special care of your skin during summer do one thing before going out scsm