Urad Dal For Skin: आपल्या सर्वांनाच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार असावी असे वाटते.कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात.
उडदाची डाळ तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करू शकते. यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. ते कसे वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो. चला तर मग जाणून घेऊया उडीद डाळीचा फेस पॅक घरी कसा बनवायचा. यामुळे कमी पैशामध्ये तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात उडीद डाळेचा तुम्ही कसा वापर कराल. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.
टॅनिंग फेसपॅक – तुम्हाला टॅनिंगची समस्या असली तरीही तुम्ही ते वापरू शकता.
कसे वापरावे
१. एक चतुर्थांश वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
२. नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा.
३. त्यात दही मिसळून पेस्ट तयार करा.
४. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि सनबर्न झालेल्या भागावर लावा.
५. साधारण १५ ते २०मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ करा.
मुरुमांसाठी उपाय – या डाळीमध्ये मुरुमांसाठी नैसर्गिक अँटीसेप्टिक असते. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरियामुळे होणारे मुरुम दूर होतात. तसेच, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ते वापरू शकता.
कसे वापरावे
१. अर्धी वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात ठेवा.
२. त्यानंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा.
३. त्यात दोन चमचे गुलाबजल आणि ग्लिसरीन मिसळा.
४. शेवटी २ चमचे बदामाचे तेल घालून लावा.
५. १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.
हेही वाचा >> रात्री लवकर झोप लागत नाही? १० मिनिटाचा सोपा उपाय; अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप
चेहऱ्यावर उजळपणा आणण्याासाठी – तुमची त्वचा निस्तेज असेल तर अशा त्वचेसाठी उडीद डाळ अतिशय फायदेशीर ठरते. ही डाळ नैसर्गिक ब्लीचप्रमाणे त्वचेवर काम करते आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी याची मदत मिळते
कसे वापरावे
१. १/४ कप उडीद डाळ आणि ८-९ बदाम एकत्र पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या
२. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर साधारण १५–२० मिनिटे तशीच लावून ठेवा
३. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि परिणाम पाहा