Home Remedies For Oily Skin : अनेकजण तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. स्किन प्रॉब्लेम्स हे मुख्यतः तेलकट त्वचा असणाऱ्यांना जास्त होतात. त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जास्त त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. सतत तेलकट होणाऱ्या त्वचेमुळे त्रस्त व्यक्ती त्यावर अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतात, पण त्याच्या अतिवापराने स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते. अशावेळी काही घरगुती उपाय वापरून तुम्ही तेलकट त्वचेपासून सुटका मिळवू शकता. कोणते आहेत ते घरगुती उपाय जाणून घेऊया.
तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय
आणखी वाचा : झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की दिसेल फरक
तेलकट पदार्थ खाणे टाळा
आपण ज्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो त्या प्रकारचं शरीर देखील त्याच प्रकारचे बनत जाते. त्यामुळे तेलकट त्वचेची समस्या असणाऱ्यांनी तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
दिवसातून २ वेळा चेहरा स्वच्छ धुवा
चेहरा सतत तेलकट होत असेल तर दिवसातून कमीतकमी दोन वेळा फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुताना अति साबण किंवा फेसवॉशचा वापर होणार नाही याची काळजी घ्या.तोंड धुण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन युक्त साबणाचा वापर करू शकता.
मध
मधामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तेलकट त्वचेमध्ये होणार्या पिंपल्सच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात. याबरोबरच मध त्वचा तेलकट होण्यापासून रोखते आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
टोमॅटो
तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी टोमॅटो हा उत्तम उपाय आहे. टोमॅटोमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते जे त्वचेतील तेल कमी करण्यास मदत करते. याबरोबरच सॅलिसिलिक ॲसिड मुरुमांच्या समस्येवरही उत्तम उपाय मानले जाते.
Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक
कोरफड
कोरफड हे त्वचेच्या समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. तेलकट त्वचेसाठी याचा वापर करायचा असेल तर आंघोळीच्या १ तास आधी चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी कोरफड वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)