आपली त्वचा नेहमी सतेज दिसावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग चेहऱ्यावर केले जातात. अनेकवेळा त्यातून चांगले परिणाम मिळतीलच असे नाही. त्यामुळे आणखी नवे प्रयोग शोधले जातात. मात्र काही घरगुती उपायांमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी सोप्या आणि त्वचेला नुकसान न करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असाच एक सहज उपाय म्हणजे चेहऱ्याचा मसाज करणे.
चेहऱ्याचा मसाज योग्यरित्या केल्यास तुमची त्वचा लगेच फ्रेश होऊन तुम्ही अधिक तरुण दिसू शकता. पण मसाज कोणत्या पद्धतीने करावा याची माहिती बऱ्याच जणांना नसते. आज आपण चेहऱ्याचा मसाज करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.
आणखी वाचा – Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या
१. दिवसभर बाहेर फिरल्याने चेहऱ्यावर धूळ जमा होते. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यामुळे बाहेरून आल्यावर सर्वात आधी चेहरा पाण्याने नीट धुवा. त्यानंतर माइल्ड क्लीनजरने चेहरा स्वच्छ करुन घ्या. थोडा वेळ चेहरा सुकू द्या.
२. आता चेहऱ्यावर तेल लावा. यासाठी तुम्ही नारळ तेलाचा देखील वापर करू शकता. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर ठरते. यानंतर जेड रोलरचा वापर करा.
३. कपाळापासून मसाज करायला सुरुवात करा. कपाळावर थोडे तेल लावून, बोटांनी हळूवार कपाळावर मसाज सुरू करा.
४. त्यानंतर भुवयांवर मसाज करा. अनेकवेळा मसाज करताना भुवयांवर मसाज केला जात नाही त्यामुळे भुवया कोरड्या दिसतात. म्हणून भुवयांवर देखील मसाज करणे आवश्यक आहे.
५. हलक्या हातांनी गालांवर मसाज करायला सुरुवात करा. बोटांच्या साहाय्याने खालून वर अशा पद्धतीने मसाज करा.
आणखी वाचा – तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सफरचंद खाल्ल्यानेही वाढू शकतं वजन; जाणून घ्या या मागील नेमकं कारण
६. गालानंतर हनुवटी आणि त्याच्या खालच्या भागात मसाज करा. त्यानंतर कानाजवळ देखील मसाज करा. मसाज पूर्ण झाल्यानंतर टॉवेलने चेहरा पुसून घ्या.
मसाजची ही पद्धत तुमचा चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी नक्कीच मदत करेल.