घरोघरी सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळस या रोपाला धार्मिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचे समजले जाते. कोणतीही पूजा, कार्य असू दे तुळस ही लागतेच. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, या तुळशीचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा उजळ आणि चमकदार ठेवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुर्वेदामध्ये वर्षानुवर्षे उत्तम आरोग्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा किंवा त्यांचे सेवन केले जाते. मात्र, त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेच्या किरकोळ समस्या अगदी सहज दूर करू शकता. चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा घालवणे तसेच त्वचा उजळण्यासाठी तुळशीचा वापर केला जाऊ शकतो.

हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्यावरील पिंपल काही केल्या जाईना? ‘या’ पाच आयुर्वेदिक गोष्टी करतील तुमची मदत…

ओझिवाचे सह-संस्थापक, मिहीर गडानी म्हणतात की, “तुळशीचा वापर करून खरंतर चेहऱ्यावरील हायपर पिगमेंटेशन, काळे डाग घालवता येऊ शकतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या घालवणे, चेहरा उजळण्याचे काम तुळस करू शकते”, अशी माहिती झी न्यूजच्या एक लेखावरून समजते.

मिहीर गडानी यांनी तुळशीचे फायदे, गुणधर्म आणि तिचा वापर करून त्वचेची काळजी कशी घ्यायची याच्या काही सोप्या टिप्स दिल्या आहेत त्या पाहू.

१. तुळशीमधील अँटिऑक्सिडंट्स

तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील अनावश्यक घटकांच्या विरुद्ध काम करते, परिणामी ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होऊन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे चेहऱ्याचा रंग एकसमान होऊ शकतो.

२. पिगमेंटेशन कमी करणे

तुळशीचा चेहऱ्यासाठी जर अधिक फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तुळस असलेले सिरम वापरू शकता. अनेक फेस सिरममध्ये तुळशीमधील फायटो नियासीनामाइड या घटकाचा वापर केला जातो. असे सिरम थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. परिणामी चेहऱ्यावरील हायपरपिगमेंटेशन कमी होते.

हेही वाचा : Skin care tips : चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी ‘स्वस्तात मस्त’ घरगुती उपाय; संत्र्याचा ‘हा’ भाग फेकू नका, असा वापरा….

३. चेहऱ्यावरील डाग घालवणे

अनेक फेस सिरममध्ये त्वचेवरील काळपटपणा घालवण्यासह, चेहऱ्यावरील डाग घालवण्याची क्षमतादेखील असते. कोरफडीचा गर ज्याप्रमाणे चेहऱ्याला थंडावा देऊन, त्वचेवरील डाग कमी करण्याचे काम करत असतो; तसेच काहीसे फेस सिरममधील घटकदेखील मदत करतात.

४. मुरुमं आणि सुरकुत्या कमी करणे

तुळशीमध्ये असणाऱ्या फायटो नियासीनामाइड नावाचा घटक तुमच्या त्वचेसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. तुळशीच्या अर्काचा वापर त्वचेवर केल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, सुरकुत्या आणि डाग घालवण्यास मदत होते.

५. त्वचेवर तजेला आणि चमक येणे

व्हाईट पेनी आणि रोझमेरी ऑइल हे तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यासाठी, एकसमान करण्यास उपयोगी असते. त्यामुळे बाजारातील रासायनिक घटक असणारी उत्पादने वापरण्यापेक्षा घरातील तुळशीचा अवश्य वापर करून पाहावा.

[टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skin care tips use tulsi leaves to get rid of deep dark spots and hyperpigmentation use these five tips dha