Skin Types: मानवी त्वचा ही फार संवेदनशील असते. यामार्फत आपल्याला स्पर्शाचा अनुभव घेता येतो. त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. त्वचेमध्ये असंख्य सूक्ष्म छिद्रे (Small pores) असतात. या छिद्रांमधून ठराविक कालावधीनंतर द्रव्य बाहेर येत असते. हे द्रव्य हानिकारक असल्याने आपल्या शरीरातून बाहेर काढले जाते. त्वचा कोरडी होऊ नये यासाठी या द्रव्याची मदत होते.

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेमधूनही अनावश्यक द्रव्य बाहेर येत असते. चेहरा तेलकट वाटण्यामागे हे कारण असते. या द्रव्यावर धूळ, माती चिपकल्याने सूक्ष्म छिद्रे बंद होतात. यामुळे पिंपल्ससारख्या समस्या उद्भवतात. त्वचेशी संबंधित हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा साफ करणे आवश्यक असते. रात्रभर झोपल्यानंतर चेहरा घाण होत असतो. म्हणून सकाळी उठल्यावर चेहरा साफ धुणे आवश्यक असते. तर दिवसभर बाहेर असल्याने चेहऱ्यावर धूळ, प्रदूषणाचा परिणाम होत असतो. मेकअपचाही चेहऱ्यावर प्रभाव पडत असतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी क्लिंझरने चेहरा स्वच्छ करणे गरजेचे असते. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्वचारोगतज्ज्ञ डॉ. कल्पना सारंगी यांनी स्कीन टाइप्ससंबंधित माहिती दिली. तसेच त्यांनी त्वचेच्या प्रकारावरुन क्लिंझरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा यावरही भाष्य केले.

High Risk Security Alert For Android Users
Android युजर्ससाठी धोक्याची घंटा! वैयक्तिक माहिती, गूगल पे, डेटाचे होईल नुकसान; फक्त ‘हा‘ एकच उपाय…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
products that will not debut on 9 September 2024
Apple Event 2024: ॲपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच, कोणते नाही? जाणून घेण्यासाठी वाचा ‘ही’ सविस्तर यादी
VIP Security in India
VIP Security in India : झेड प्लस, झेड, वाय प्लस, वाय आणि एक्स दर्जाच्या सुरक्षेत काय फरक असतो? जाणून घ्या!
artificial intelligence kutuhal
कुतूहल: पक्षपाताचा धोका
iPhone new bug latest news marathi
iPhone वापरताय? मग ही चार चिन्हं टाईप करताच फोन होईल क्रॅश; आयफोनमध्ये नवा बग सापडला!
What happens to the body when you take protein supplements every day?
Proteins supplements: तुम्हीही दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती चांगलं, किती वाईट?

Dry skin

असा स्कीन टाइप असलेल्या लोकांच्या त्वचेमधील सूक्ष्म छिद्रांमधून कमी प्रमाणात द्रव्य बाहेर पडते. अशा लोकांनी कोरफड, ओटचे जाडे भरडे पीठ, डायमेथिकोन आणि लॅनोलिन असे घटक असलेल्या क्लिंझरचा वापर करावा. यामुळे त्यांची त्वचा मॉइश्चरायझ राहण्यास मदत होईल.

Oily skin

सूक्ष्म छिद्रांमधून अतिरिक्त प्रमाणात तेल बाहेर आल्याने चेहरा तेलकट होतो. असे होत असल्यास सॅलिसिलिक अ‍ॅसिड, ग्लायकोलिक अ‍ॅसिड आणि विच हेझेल अशा घटकांचा समावेश असलेले क्लिंझर नियमितपणे वापरावे. यामुळे छिद्रांमधून निघणाऱ्या तेलकट द्रव्याचे प्रमाण कमी होते.

आणखी वाचा – उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने नक्की होईल फायदा

Combination skin

अशा प्रकारची त्वचा असल्यास नियासिनमाइड, ग्लिसरॉल, पॅन्थेनॉल आणि प्रोपीलीन ग्लायकोल असलेल्या क्लिंझरचा वापर करावा. असे केल्याने त्वचेमध्ये संतुलन टिकून राहण्यास मदत होईल.

त्वचेच्या प्रकारानुसार योग्य क्लिंझरचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहते. जर तुमची त्वचा कोरडी आहे आणि तुम्ही ऑईली स्कीन टाइपसाठी असलेल्या क्लिंझरचा वापर करत असाल, तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. असे घडू नये म्हणून क्लिंझर वापरण्यापूर्वी स्कीन टाइपची माहिती असणे आवश्यक असते.