सकाळचा नाश्ता तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. दिवसभरातील इतर जेवणांपेक्षा ते अधिक आरोग्यदायी मानले जाते. संशोधनात असे दिसून आले आहे की जी लोकं नाश्ता करत नाहीत त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. दीर्घकाळ उपवासाच्या अवस्थेत राहणे शरीरासाठी अधिक तणावपूर्ण असते आणि त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. शरीराला कराव्या लागणार्या अतिरिक्त कामामुळे चयापचय क्रियेत चढ-उतार होतात, ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते.
अधिक निरोगी सकाळचा नाश्ता
दुसरीकडे डायटिंग करणाच्या नादात काही लोकं नाश्त्याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुमचा असा गैरसमज असेल की, नाश्ता न केल्याने तुमचे वजन कमी होते, तर हे तथ्य चुकीचे आहे. उलट ते तुम्हाला लठ्ठपणाचे शिकार बनवेल. नाश्ता न करणार्यांपेक्षा दररोज नाश्ता करणारे हेल्दी असतात हे अनेक अभ्यासात सिद्ध झाले आहे.
हेल्दी डायट
जी लोकं रोज सकाळी नाश्ता करतात ते क्वचितच जास्त वजन किंवा लठ्ठ झालेले दिसतात. मात्र ही लोकं जास्त काळ आजारी पडत नाहीत. या कारणास्तव अनेक तज्ञांनी नाश्ता केल्याचा दावा केला आहे. साधारणपणे, ज्या लोकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवय असते त्यांना फायबर आणि मायक्रोन्युट्रिएंट्स समृद्ध असलेले निरोगी आहार मिळतो. त्याचबरोबर जी लोकं नाश्ता करत नाहीत त्यांना सिगारेट, दारू पिण्याची सवय असते. तसेच अशी लोकं व्यायाम कडे दुर्लक्ष करतात.
योग्य आणि संतुलित नाश्ता
द बीएमजेमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, तुमची चयापचय क्रिया तुम्ही दिवसभरात किती अन्न खाता यावर अवलंबून असते. जी लोकं सकाळचा नाश्ता खात नाही, ते नाश्ता करणार्या लोकांपेक्षा जास्त लठ्ठ असतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, योग्य आणि संतुलित नाश्ता केवळ तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करत नाही, तर शरीर निरोगी आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्याचे काम करते. असे मानले जाते की नाश्ता न करणे हे देखील लठ्ठपणाचे कारण असू शकते.
काही अभ्यासांमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की नाश्ता करून तुम्ही एका दिवसात ४०० कॅलरीज कमी खातात. नाश्ता न केल्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होतो. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला डोकेदुखी, चक्कर येणे आणि लक्ष नसणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळी भूक लागली असेल तर नाश्ता नक्की करा. जेणेकरून तुम्हाला चांगल्या दिवसाची सुरुवात करता येईल.