Is it healthy to take a nap in the afternoon: झोप ही सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नेहमी ऐकतो की, आठ तासांची झोप आवश्यक आहे. झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. ती आपल्या शरीराची एक जैविक गरज आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. एखाद्यावेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर, आपल्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो हे आपल्याला माहिती आहे. मात्र सतत अपुऱ्या झोपेच्या क्रमामुळे आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत असतो. पण दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे का?
दुपारी झोपणे योग्य की अयोग्य?
तथापि, दुपारी झोपण्याचे अनेक फायदे असले तरीही याचे काही तोटेही आहेत. दुपारी झोपल्यामुळे आपल्याला कफ, शिंका येणे आणि अंगात आळस भरणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणून दुपारी झोपणे शक्यतो टाळावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले जाते. एखादी व्यक्ती दुपारी ६० मिनिटांपेक्षा जास्त आणि दोन तासापर्यंत झोपून राहत असेल, तर त्याच्या रात्रीच्या झोपेत दोष असतात. एक तर ती गरजेपेक्षा कमी काळ असते किंवा त्या व्यक्तीला झोपेसंदर्भात काही आजार असू शकतात.
(हे ही वाचा : कोणते ड्रायफ्रूट्स भिजवूनच खावे, कोणते न भिजवता? आरोग्यासाठी फायदेशीर कोणते? जाणून घ्या पटकन! )
काय सांगतात तज्ज्ञ?
दिवसा झोपल्याने झोपल्याने आणि रात्री जागरण केल्याने रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तथापि, तज्ञ चेतावणी देतात की दिवसभरात जास्त वेळ झोपल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. डॉ कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, “झोप घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती १५ ते २० मिनिटे ठेवावी आणि ती दुपारी घ्यावी कारण संध्याकाळी डुलकी झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकते.” अधिक वारंवार डुलकी घेतल्याने हानिकारक आणि दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. पण पण तुम्ही खूपच थकलेले असाल तर अर्धा ते एक तास झोप घ्यायला हरकत नाही.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि पचन आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे. दुपारी थोडा वेळ झोप घेतली जाऊ शकते. हे लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि भरपूर काम करणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे.
(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)