Sleeping late at night: बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना रात्री वेळेवर झोप येत नाही. त्यामुळे साहजिकच लोक उशिरा उठतात. त्याशिवाय अनेक जण रात्री अंथरुणावर झोपल्यानंतर तासन् तास त्यांच्या मोबाईलवर रील पाहतात किंवा गेम खेळतात. अशा परिस्थितीत, त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झोपल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रात्री उशिरा झोपल्याने काय होते?
मानसिक आरोग्यावर परिणाम
रात्री उशिरा झोपल्याने मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. उशिरा झोपल्यामुळे ताणतणाव व नैराश्य यांसारख्या समस्यादेखील उद्भवतात. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये न्यूरोट्रान्स्मिशन योग्यरीत्या होत नाही. कधी कधी योग्य झोप न मिळाल्यामुळेही मूड स्विंग होत राहतो. त्यामध्ये तुम्हाला राग, चिडचिड व तणाव यांसारख्या समस्यांचा त्रास होऊ लागतात. रात्री योग्य वेळी झोप न घेतल्याने स्मरणशक्तीही कमकुवत होऊ लागते.
वजन वाढते
झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो. झोपेच्या कमतरतेमुळे वजनही वेगाने वाढू लागते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
त्वचेवरही दिसतो परिणाम
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य नष्ट होते. पुरेशी झोप न घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्याच वेळी झोपेच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी दिसू लागते.