वास्तूशास्त्राला सध्या केवळ भारतातच नाही तर जगातही महत्त्व आले आहे. या विषयाचे विशेष अभ्यासक्रमही आहेत. याला केवळ धार्मिक नाही तर शास्त्रीय संदर्भ आहेत असे यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्याला घरातील वरिष्ठ मंडळी अनेकदा सांगतात अमुक एका दिशेला पाय करुन झोपू नको. अमुक एक गोष्ट या दिशेला असू नये. तेव्हा आपण त्यांच्याशी काही प्रमाणात वादही घालतो. मात्र त्यामागील शास्त्र आपल्याला पटले तर आपल्याला ती गोष्ट मान्यही होते.

नवीन घर घेताना त्या घराचा दरवाजा, ओटा, देवघर कुठे आहे हे आपण तपासून पाहतो. घरातील फर्निचर कसे ठेवता येईल याचा साधारण अंदाज घेतो. मात्र आपली झोपण्याची स्थिती काय असावी याविषयी मात्र आपण जागरुक नसतो. पण विशिष्ट दिशेला डोके करुन झोपल्यास आरोग्य चांगले राहते. मग आपण गादीवर झोपतो की चटईवर यापेक्षाही आपल्या झोपण्याच्या स्थितीला जास्त महत्त्व असते. उत्तम आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीदेखील एक महत्त्वाची भूमिका बजावते. तर आता योग्य स्थिती म्हणजे नेमके काय? झोपताना कोणती काळजी घ्यावी? तर उत्तरेकडे डोके करुन झोपण आरोग्यासाठी हानिकारक असते.

दीर्घायुष्यासाठी बैठी अवस्था टाळा

मानवी शरीराचे स्वतःचे मॅग्नेटिक फिल्ड असते. जेव्हा तुम्ही उत्तरेला डोके करून झोपता तेव्हा शरीर मॅग्नेटीक फिल्डशी समांतर नसते. याचा परिणाम रक्तदाबावर होतो, हा रक्तदाब सुरळीत करण्यासाठी शरीराला झोपेत वेगाने काम करावे लागते आणि त्याचा हृद्यावर अधिक ताण येतो. तुमचे वय जास्त असेल आणि रक्तवाहिन्या कमजोर असतील तर अशाप्रकारे उत्तरेकडे डोके करुन झोपल्यास तुम्हाला पक्षाघात किंवा हॅमरेजचा धोका असतो. आपण आडवे झोपतो तेव्हा आपोआपच हृद्याचे ठोके कमी होतात. उत्तरेला डोके करून झोपल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. त्यामुळे आपोआपच झोपेचे चक्र बिघडते आणि विनाकारण ताणही वाढतो. त्यामुळे तुम्हाला रात्री ८ तासाची झोप घेऊनही सकाळी फ्रेश वाटत नसेल तर तुमच्या झोपण्याची दिशाही तपासून पाहणे आवश्यक आहे.

कोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत ?

आता उत्तरेला डोके करुन झोपू नये हे ठिक आहे. पण मग कोणत्या दिशेला डोके केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर असते? तर पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके करुन झोपल्यास ते हानिकारक नसते. याबरोबरच डाव्या कुशीवर झोपणेही चांगले असते. त्यामुळे जळजळ होण्याचा त्रास असेल तर तो कमी होतो.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)