तुम्ही सहा तासांपेक्षा कमी किंवा दहा तासांहून अधिक झोपत असाल सावधान! त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये हृदयविकार, मधुमेह, नैराश्य, लठ्ठपणा याचा धोका असल्याचा निष्कर्ष सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या(सीडीसी)च्या अभ्यासात पुढे आला आहे.
दिवसभरात सात ते नऊ तास जे झोप घेतात त्यांचे आरोग्य कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत चांगले राहते. सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना गंभीर आजारांचा धोका आहे. दहा तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांमध्येही गंभीर आजारांचे प्रमाण आढळत असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. झोपेच्या वेळेच्या अनियमिततेमधून सतत मानसिक स्वास्थ बिघडणे, लठ्ठपणा आढळून आल्याचे या अभ्यासाचे सहलेखक जेनेट बी कॉफ्ट यांनी सांगितले. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णाचे मानसिक आरोग्य आणि वजन पाहण्याबरोबर तो किती तास झोप घेतो याचीही डॉक्टरांनी तपासणी केली पाहिजे असे कॉफ्ट यांनी सुचवले आहे.
या अभ्यासात ४५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील ५४ हजार जणांचा समावेश होता. त्यामधील ३१ टक्के लोक हे सहा तासांपेक्षा कमी झोप घेणारे आढळले. तर ६४ टक्के जण सात ते नऊ तास झोप घेतता. तर केवळ चार टक्के जणांनी दहा तासांहून अधिक वेळ झोपत असल्याचे सांगितले. ज्या लोकांना गंभीर आजार आहेत त्यांच्यामध्ये झोपेची समस्या आढळते. जर तुम्हाला निद्राविषयक कोणता आजार असेल तर तुम्ही तातडीने उपचार घ्या. त्यामुळे तुमचे जीवनमान उंचावले असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
अभ्यासाचे निष्कर्ष
* सहा तासांपेक्षा कमी किंवा दहा तासांपेक्षा जास्त झोप धोकादायक
* अपुऱ्या किंवा अति झोपेमुळे गंभीर आजारांचे धोके
* सात ते नऊ तास झोप घेणाऱ्यांचे आरोग्य तुलनेत चांगले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा