Disadvantages Of Wearing Socks At Night : थंडीत झोपताना स्वेटर, कानटोपी, गोधडी, चादर व पायात मोजे आदी आपण सगळेच वापरतो. ज्या लोकांचे पाय हिवाळ्यात थंड राहतात, त्यांना अनेकदा मोजे घालून झोपायला खूप आवडते (Sleeping With Socks). अशा लोकांचा असा विश्वास असतो की, मोजे घालून झोपल्याने चांगली झोप येते. पण, काही लोक म्हणतात की, हे अत्यंत चुकीचे आहे.

तर झोपताना मोजे घालावेत की नाही याबद्दल ठोस पुरावा नसला तरीही आपण या लेखातून मोजे घालून झोपण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत (Sleeping With Socks)…

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
police arrested the dumper owner in the wagholi accident case
पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत
injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
winter health hacks | How to wake up early in morning in winter
Winter Lifestyle : थंडीच्या दिवसात सकाळी काही केल्या लवकर जाग येत नाही? मग करा ‘या’ ५ गोष्टी, लगेच येईल जाग

रात्री मोजे घालून झोपण्याचे फायदे (Benefits of wearing socks at night while sleeping)

१. झोपेची गुणवत्ता सुधारण्यात मदत

रात्री झोपताना मोजे परिधान केल्याने शरीराचे तापमान नियंत्रित होऊन, झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. उबदार पाय तुमच्या शरीराला तुमचे तापमान कमी करण्यासाठी सिग्नल देतात.ज्यांचे हातपाय थंड असतात, त्यांच्यासाठी हे चांगले आहे.

२. घाम येण्यास प्रतिबंध घालते

रात्री मोजे घालून झोपणे पायांना घाम येण्यास प्रतिबंधित घालू शकते. जर सकाळी उठल्यावर तुमच्या पायांना घाम जाणवत असेल किंवा थंडी वाजत असेल, तर फॅब्रिकचे मोजे पायांचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.

३. रक्ताभिसरण सुधारते

ज्यांचे रक्ताभिसरण चांगले नसते, जसे की ज्यांना रेनॉड्स (raynaud disease) हा आजार असणाऱ्या व्यक्तींना, मोजे घालून आराम मिळू शकतो. मोजे उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि पाय सुन्न होण्यास प्रतिबंधित करतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते (Sleeping With Socks) .

४. त्वचेचे आरोग्य सुधारते

काही लोकांची त्वचा कोरडी असते. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज केले, तर तुमच्या पायांना मॉइश्चरायझेशन राहील. जाड मोजे घालण्याऐवजी हवा खेळती राहण्यायोग्य मोजे घालण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा…How To Dry Clothes In Winter : हिवाळ्यात कपडे ओलसर राहतात? मग वापरून पाहा ‘हे’ तीन हॅक, झटक्यात होईल तुमचं काम

रात्री मोजे घालून झोपण्याचे तोटे (Disadvantages of wearing socks at night while sleeping)

१. गरम होणे

जेव्हा तुम्ही मोजे घालता तेव्हा तुमचे शरीर आतून गरम होऊ लागते. तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. पण, शरीर खूप गरमही होऊ शकते आणि त्यामुले तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते (Sleeping With Socks). सिंथेटिक फॅब्रिकचे मोजे (synthetic fabric) परिधान केल्याने उष्णता आणि आर्द्रता अडकून राहू शकते, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवते.

२. स्वच्छतेशी संबंधित समस्या

घाणेरडे किंवा घट्ट मोजे घातल्याने जीवाणू आणि बुरशीचे प्रमाण वाढू शक्ती. ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही मोजे घालत असाल, तर तुमचे मोजे स्वच्छ आणि हवा खेळती राहण्यायोग्य असल्याची खात्री करा.

३. रक्त परिसंचरण विस्कळित होणे

पायांत घातलेले मोजे कधीही खूप घट्ट नसावेत. सैल मोजे परिधान केल्याने तुमचा रक्तप्रवाह सुधारतील; पण घट्ट मोजे रक्तप्रवाह प्रतिबंधित करू शकतात, ज्यामुळे अस्वस्थता येते, झोपेच्या वेळी रक्त परिसंचरणावर नकारात्मक परिणाम होतो.

मग झोपताना मोजे घालावेत की नाही? (Sleeping With Socks)

मोजे घालावेत की नाही हे आपल्या गरजांवर अवलंबून असते. तुमचे पाय वारंवार थंड असल्यास किंवा रक्ताभिसरण चांगले नसल्याची लक्षणे जाणवत असल्यास, मोजे परिधान केल्याने आराम मिळेल आणि रक्तप्रवाह सुधारेल. लूज-फिटिंग, कापूस किंवा लोकर यांसारख्या नैसर्गिक कपड्यांपासून बनवलेले मोजे निवडा. कोरडे किंवा फुटलेले पाय असलेल्या लोकांसाठी, पायांची क्रीम (foot cream) लावणे, सुती मोजे घालणे आदी अनेक गोष्टी त्वचेला मऊ करून, ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. तुम्हाला कोणतीही अस्वस्थता वाटत नसल्यास तुम्ही मोजे घालू शकता. तुम्हाला खूप थंडी जाणवत असेल, तर तुमचे पाय गरम करण्यासाठी मोजे घाला आणि मग थोड्या वेळाने मोजे काढून ठेवा. जर तुम्ही रात्री मोजे घालून झोपत असाल, तर तुमचे पाय आणि मोजे दोन्ही स्वच्छ असल्याची खात्री करा. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो. याव्यतिरिक्त स्वच्छता राखण्यासाठी दररोज रात्री आपले मोजे बदला.

Story img Loader