Walking speed Health Benefits In Marathi : आपल्यातील अनेक जण फिट राहण्यासाठी भरपूर गोष्टी करतात. फिटनेससाठी चालणे महत्त्वाचे आहे हा सल्ला आपल्याला अगदी प्रत्येक जण देत असतात, आपल्याला दररोज इतका वेळ चालले पाहिजे असे सुद्धा सांगतात. कारण दररोज चालण्याचे बरेच फायदे आहेत. पण, खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती असेल की, चालताना तुमचा वेग, तुमच्या आरोग्यावर वेगवेगळा परिणाम करतो. तुमचा चालण्याचा वेग तुमचे आरोग्य कसे आहे हे सुद्धा दर्शवितो (Slow Walking Vs Fast Walking) . जर तुम्ही दररोज खूप हळू चालत असाल तर त्याचा फायदा होण्याऐवजी तुमचे भरपूर नुकसान होऊ शकते, त्यामुळे चालण्याच्या वेगाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
असोसिएशन ऑफ न्यूरोकॉग्निटिव्ह अँड फिजिकल फंक्शन्सच्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जर तुमचा चालण्याचा वेग कमी असेल तर तुम्ही वयापेक्षा जास्त वयस्कर दिसता ( (Slow Walking Vs Fast Walking). दुसरे म्हणजे, मंद गतीने चालणे तुमची स्नायू शक्ती कमकुवत करू शकते.
हेही वाचा…‘बाबांशिवाय अपूर्ण…’ वाजत, गाजत नाही तर अशा प्रकारे आली नवरी मंडपात; Viral Video पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी
मग वेगाने चालण्याचे फायदे काय आहेत? (Slow Walking Vs Fast Walking)
संशोधनात असेसुद्धा म्हटले आहे की, हळू किंवा मंद गतीने चालणाऱ्या लोकांपेक्षा वेगाने चालणारे लोक अधिक निरोगी असतात. जर तुम्ही चांगल्या स्पीडने किंवा वेगाने चालतात तर त्यांची हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली हळू चालणाऱ्यांपेक्षा अधिक मजबूत असते. जलद चालण्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, फुफ्फुसाचे कार्यदेखील सुधारते.
वेगाने चालल्याने तुम्ही तरुण दिसाल?
अभ्यासानुसार, जे लोक दररोज वेगाने (स्पीडने) चालतात ते इतरांपेक्षा तरुण दिसतात. म्हणजे जे लोक नियमित चालतात ते वृद्धत्व कमी करण्यात यशस्वी होतात; तर स्पीडने किंवा वेगात न चालल्यामुळे तुम्ही वयाने मोठे दिसू शकता. दररोज चांगल्या वेगाने चालल्याने तुमचे वजन कमी होते, हृदय मजबूत आणि शरीर चपळ व सक्रिय राहते.