कार खरेदी करणे जितके महाग असते तितकेच तिची काळजी घेणेही खूप महाग असते. कारमध्ये थोडासा जरी प्रोब्लेम झाला तरी हजारो रुपये खर्च येतो. पण कार वापरणाऱ्यांसाठी असे काही सोप्पे आणि स्वस्त जुगाड आहेत ज्याचा वापर करुन ते हजारो रुपयांची बचत करु शकतात. हे सर्व फक्त साबणाच्या एका वडीच्या मदतीने केले जाऊ शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कसे ते जाणून घेऊया-

कारमधील वास दूर करण्यासाठी

कार व्यवस्थित स्वच्छ ठेवली नाही तर त्यातून विचित्र वास येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी लोक सहसा महाग फ्रेशनर वापरतात. पण ज्यांना फ्रेगनेंसची ऍलर्जी आहे त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सुगंधित साबण खूप उपयुक्त ठरु शकतो. यातील अरोमा थेरपीमुळे कारमधील दुर्गंधीची समस्या दूर होते.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…

कारच्या दरवाजातून येणारा आवाज कमी करण्यासाठी

जेव्हा कारचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना तेव्हा काहीवेळा एक विचित्र आवाज येतो.तो आवाज बंद करण्यासाठी तुम्ही साबणाची मदत घेऊ शकता. यासाठी कारच्या दरवाज्याच्या बोल्टवर म्हणजे दरवाजे जिथून वळले तिथे साबणाणे घासा.

विंडशील्ड स्वच्छ करण्यासाठी

कार चालवताना समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशावेळी विंडशील्ड चांगले स्वच्छ असणे महत्वाचे आहे. पण कधी कधी ती इतकी घाण होतो की वायपरनेही साफ करता येत नाही मग मेकॅनिकलची मदत घ्यावी लागते. परंतु जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही विंडशील्डवर साबणाचा बार घासून वर्तमानपत्राने स्वच्छ करू शकता. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा. पण साबण एकदम हलक्या हाताने विंडशील्डवर घासा अन्यथा विंडशील्डवर स्क्रॅच येऊ शकतात.

बाजूचे मिरर सतत पुसण्याची गरज लागणार नाही

पावसामुळे कारच्या बाजूच्या आरशावर पाणी पडत असते. यामुळे चालकाला मागचे दिसण्यात अडचणी येतात. अशावेळी कारचे मिरर पुन्हा पुन्हा पुसत राहावे लागते. पण त्यावर एकदा साबणाची वडी चोळा. त्यामुळे त्यावर पाणी साचणार नाही.

दरवाजाच्या रबर स्ट्रिपचा येणारा आवाज बंद करण्यासाठी

कारचा दरवाजा उघडताना आणि बंद करताना त्यावरील रबरी स्ट्रिप जीर्ण झाली तर आवाज येतो. पण हा आवाज बंद करण्यासाठी काही दिवस त्यावर कोरडा साबण चोळू शकता.

Story img Loader