धुम्रपानाचा केवळ शरिर स्वास्थावर परिणाम न होता धुम्रपान करणाऱया व्यक्तींमध्ये प्रोत्साहकतेचा अभाव जाणून येण्यास सुरूवात होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.
धुम्रपान करणाऱया व्यक्ती शाररिकदृष्ट्या कमी सक्रीय असल्याचे संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. धुम्रपानामुळे प्रोत्साहीत वृत्ती ठासळत जाते तसेच धुम्रपान करणाऱया व्यक्ती चिंता आणि उदासीनतेच्या लक्षणांनी सतत ग्रस्त असल्याचेही निष्पन्न झाले आहे. ब्राझीलमधील एका नामांकीत विद्यापीठाच्या अहवालानुसार धुम्रपान न करणाऱया व्यक्ती धुम्रपान करणाऱया व्यक्तींपेक्षा अधिक प्रोत्साहीत वृत्तीच्या असतात.
याचा शारिरिकदृष्ट्या असलेला अभाव जाणून घेण्यासाठी ६० धुम्रपान करणाऱया व्यक्ती आणि ५० धुम्रपान न करणाऱया व्यक्ती दिवसातल्या १२ तासांपैकी कितीवेळ पायी चालतात याचा अभ्यास केला गेला. यातून धुम्रपान करणाऱया व्यक्ती चालण्यात किंवा कोणत्याही शाररिक कामात आळशी असल्याचे आढळून आले आहे. तसेच दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना दिर्घश्वास घेण्यास सांगितले असता धुम्रपान करणाऱया व्यक्तींमध्ये धुम्रपान न करणाऱया व्यक्तींपेक्षा श्वास रोखून धरण्याची क्षमता कमी असल्याचेही समोर आले आहे. 

Story img Loader