अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे संशोधन
धूम्रपानाच्या अतिरेकामुळे कर्करोग किंवा क्षयरोग होऊ शकतो, हे अनेकांना माहीत आहे. पण अधिक प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे त्यापासून ‘टाइप टू मधुमेह’ होऊ शकतो, असे संशोधन अमेरिकेतील आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विभाग, चीनमधील हुआजोंग विद्यापीठ आणि सिंगापूरमधील नॅशनल विद्यापीठ यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे.
मधुमेह झालेल्या काही रुग्णांचा त्यासाठी अभ्यास करण्यात आला. सातत्याने धूम्रपान करणाऱ्या ११.७ टक्के पुरुष रुग्ण आणि २.४ टक्के महिलांना टाइप टू मधुमेह झाल्याचे या संशोधनात लक्षात आले. जगभरात सुमारे दोन कोटी ७८ लाख रुग्णांना मधुमेह असून, त्यापैकी अनेकांना केवळ धूम्रपानाच्या अतिरेकामुळे मधुमेह झाला आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला.
धूम्रपान सोडल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर या रुग्णांपैकी अनेकांचा मधुमेहाचा धोका कमी झाल्याचेही लक्षात आले.
‘‘सातत्याने धूम्रपान करणे हे सार्वजनिक आरोग्यास बाधा आणते. धूम्रपानाने मधुमेह होऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे धूम्रपानापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवे, त्यासाठी जनजागृतीचीही गरज आहे,’’ असे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि हे संशोधन करणाऱ्या गटाचे प्रमुख फ्रँक हू यांनी सांगितले.

ंधूम्रपान सोडल्यानंतरही..
जे लोक सातत्याने धूम्रपान करतात त्यांना ३७ टक्के मधुमेहाचा धोका असतो, तर जे पूर्वी धूम्रपान करत होते, पण कालांतराने धूम्रपान सोडले आहे, अशांनाही १४ टक्के मधुमेहाचा धोका असतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
ज्यांनी पाच वर्षांपूर्वी धूम्रपान सोडले, अशा रुग्णांना टाइप टू मधुमेहाचा धोका ५४ टक्के अधिक असतो, असेही या शास्त्रज्ञांना आढळले.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Shah Rukh Khan quits smoking at the age 59
शाहरुख खानने वयाच्या ५९ व्या वर्षी सोडले धूम्रपान; जाणून घ्या धूम्रपान सोडण्याचे फायदे