धुम्रपान करणाऱ्या माता त्यांच्या बाळासाठी धोकादायक ठरू शकतात. मातांनीकेलेल्या धुम्रपानामुळे त्यांच्या बाळाला श्वसनासंदर्भात विकार होऊ शकतात. मातांनीकेलेल्या धुम्रपानामुळे त्यांना होणाऱ्या बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होवून, बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याची चेतावणी एका नव्या अभ्यासामधून देण्यात आली आहे.   
धुम्रपान करणाऱ्या मातांच्या ५० टक्के अर्भकांना वेगवेळ्या संसर्गामुळे रूग्णालयांमध्ये दाखल करावे लागते. यातील बरीच बालके वेगवेगळे गंभीर आजार होऊन दगावत असल्याचा दावा या अभ्यासावर काम करणाऱ्या संशोधकांनी केला आहे. या उलट ज्या माता धुम्रपान करत नाहीत त्यांच्या बालकांमध्ये आजारांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आढळल्याचे हा अभ्यास म्हणतो.
या अभ्यासा दरम्यान संशोधकांनी बऱ्याच रूग्णालयांचे अहवाल पडताळले आहेत. संशोधकांनी वॉशिंग्टन राज्यातील १९८४ ते २००४ पर्यंत रूग्णालयांमध्ये जन्मलेल्या एकूण ५०,००० अर्भकाचे दाखले तपासले.   
यामध्ये श्वसनाचा विकार झालेल्या व न झालेल्या किती अर्भकांचा मृत्यू झाला याची पडताळणी करण्यात आली.
“गर्भारपणामध्ये धुम्रपान करणाऱ्या मातांनी जन्म दिलेल्या बालकांमध्ये गुंतागुंतीचे आरोग्याविषयी समस्या निर्माण झाल्या असल्याच्या आम्हाला आढळल्या. मातांच्या धुम्रपाणामुळे अनेक बालकांमध्ये धोकादायक आजार आढळले. त्यामध्ये बऱ्याच अर्भकांचे जन्मावेळी वजन अतिशय कमी होते. धुम्रपान करणाऱ्या बऱ्याच महिलांचे बाळंतपण वेळे आधीच झाल्याचे अहवालांमध्ये दिसले. बऱ्याच बालकांच्या  फुप्फुसांची वाढ पूर्ण झाली नसल्याचे दिसले,” असे या अभ्यासावर संशोधन करणारे अबिगली हल्परीन म्हणाले.
हा अभ्यास ‘पेडियाट्रीक इन्फेक्शिअस डिसिजेस’ या नियतकालीकामध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक(एएपी)मध्ये या आठवड्यामध्ये या अभ्यासावर सादरीकरण करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा