घोरणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, अनेक वेळा लोक झोपताना इतक्या जोर जोरात घोरतात की त्यामुळे त्यांच्या जोडीदाराची किंवा त्यांच्यासोबत झोपलेल्या लोकांची झोप उडते. त्याचवेळी, तुम्हालाही अनेकदा अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच ५ सोप्या टिप्स सांगत आहोत ज्या वापरून तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून लवकर सुटका मिळवू शकता.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते,”जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा काही वेळा श्वास घेताना श्वसनसंस्थेत अडथळे निर्माण होतात. या स्थितीत, झोपताना श्वास घेताना आणि सोडताना, आपल्या मानेच्या आणि डोक्याच्या मुलायम ऊती( soft tissue) शिथिल होतात आणि कंप पावतात आणि त्यामुळे हा नकोसा आवाज निर्माण होऊ लागतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, झोपेत असताना वायुमार्गात अडथळा निर्माण होतो श्वास घेताना ज्यामुळे हवा आत आणि बाहेर करण्यासाठी अधिक जोर द्यावा लागतो, ज्यामुळे मुलायम ऊतींमध्ये कंपन निर्माण होते आणि घोरण्याचा आवाज येऊ लागतो. त्याच वेळी, जर तुमचा जोडीदार देखील झोपताना जोर जोरात घोरतो, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, या टिप्स तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

हेही वाचा –घरात उंदरांनी धूमाकूळ घातला आहे का? या सोप्या ट्रिक्स वापरा, न मारताच गायब होतील घरातील सर्व उंदीर

झोपताना एका बाजूला झोपा
जर तुमचा जोडीदार त्याच्या पाठीवर सरळ झोपला असेल आणि या दरम्यान तो जोरात घोरत असेल तर त्याला झोपताना त्याची बाजू बदलण्याचा सल्ला द्या अन्यथा अनेक वेळा जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीवर झोपता श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत घोरण्याची समस्या उद्भवू शकते.

ऑलिव्ह ऑईल
काहीवेळा नाकात सूज येणे किंवा नाक बंद पडणे यामुळे घोरणे देखील होऊ शकते. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी नाकात ऑलिव्ह ऑईलचे ४ ते ५ थेंब टाकून घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. वास्तविक, ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि घोरण्याच्या बाबतीत आराम मिळतो.

हेही वाचा – Gulab Jamun Latte: तुम्ही कधी गुलाबजाम कॉफी प्यायली आहे का? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा

मद्यपान करू नका
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्याने घोरण्याची समस्या देखील होऊ शकते. वास्तविक, दारूमुळे घशाचे स्नायू संकुचित होतातते, ज्यामुळे घोरण्याची सामान्य निर्माण होते. विशेषत: झोपण्याच्या ४ ते ५ तास आधी दारू प्यायल्याने घोरण्याची शक्यता वाढते.

उशीचे कव्हर वेळोवेळी बदला.
बहुतेक लोक वेळोवेळी बेडशीट बदलण्याचे लक्षात ठेवतात, परंतु यावेळी उशीचे कव्हर बदलणे विसरतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर ही सवय आताच बदला. ताकण कालांतराने धूळ आणि केसांचे तेल तुमच्या उशीला चिकटू लागते. त्याच वेळी, जेव्हा ते आर्द्रतेच्या संपर्कात येते तेव्हा त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, जे झोपताना तुमच्या नाकातून किंवा तोंडातून शरीराच्या आत पोहोचतात, जे दमा रुग्णांसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. तसेच उशीमधील धुळीचे कण आणि बॅक्टेरियामुळे घोरण्याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उशीची कव्हर वेळोवेळी धुवा आणि उन्हात वाळवा, तसेच दर ३ ते ६ महिन्यांनी एकदा उशी स्वच्छ करा.

हेही वाचा – Secret Santa गेम खेळताना चिठ्ठ्यांचा गोंधळ होतोय? आता नव्या पद्धतीने निवडा सिक्रेट सांता, जाणून घ्या सोपी ट्रिक

हायड्रेटेड रहा
या सर्वांशिवाय शरीरात पाण्याची कमतरता आणि घसा कोरडा पडणे यामुळेही घोरणे होऊ शकते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या द्रवपदार्थाचे सेवन करा आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा. डिहायड्रेशनमुळे नाक आणि टाळू चिकट होतात आणि त्यामुळे घोरणे वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी कोमट पाणी, नारळ पाणी, ताक इत्यादींचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snoring remedies try these 5 tips before sleeping to get rid of snore throughout the night snk
Show comments