FAQs About Solar AC: सोलार एसी ही एक प्रकारची एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे जी सौर ऊर्जेचा वापर करते. सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग वीज निर्मितीसाठी करून पुढे हीच ऊर्जा एअर कंडिशनरसाठी वापरण्याची कमाल युक्ती या उत्पादनाच्या मागे आहे. एकाप्रकारे उन्हाच्या झळांवर रिव्हर्स कार्ड खेळण्याची ही पद्धत अलीकडे बरीच चर्चेत आली आहे. नेमका हा सोलार एसी कसा काम करतो, त्याचा खर्च किती व तुम्हाला तुमच्या घरातील एसीसाठी अशी काही सोय करता येईल का याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया..

सोलार एसी कसं काम करतो?

सोलर पॅनेल सौर ऊर्जा संकलित करतात आणि त्यातून वीज निर्मिती होते. ही वीज नंतर एअर कंडिशनरला उर्जा देण्यासाठी वापरली जाते. या प्रकारची प्रणाली पर्यावरण संवर्धनासह आपलं वीज बिल सुद्धा कमी करू शकते.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले

सोलार एसीचे फायदे

  1. सोलर पॅनल एसी अधिक विश्वासार्ह आहेत आणि पारंपारिक एसी पेक्षा कमी देखभाल आवश्यक आहे. या एसींना वारंवार सर्व्हिसिंगची आवश्यकता नसते.
  2. सोलर पॅनल एसी निवडताना, तुमच्या घराचा आकार आणि तुम्हाला किती ऊर्जा लागते याचा विचार करा. तसेच, तुमचे बजेट आणि मॉडेलमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचा प्रकार विचारात घ्या.
  3. सोलर एअर कंडिशनर्स पारंपारिक एअर कंडिशनर्सपेक्षा ५०% कमी ऊर्जा वापरू शकतात कारण ते सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून असतात.
  4. हे एसी विजेवर अवलंबून नसल्यामुळे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या वायरिंगची आवश्यकता नाही. तुम्हाला इंस्टॉलेशन किंवा देखभालशी संबंधित कोणत्याही अतिरिक्त खर्चाची काळजी करण्याची गरज नाही.
  5. सोलर एअर कंडिशनर अतिशय शांत आणि कार्यक्षम असतात. पारंपारिक एअर कंडिशनर्स सुरु करताच होणाऱ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागणार नाही.
  6. सूर्यप्रकाश नसताना एसी नीट काम करण्यासाठी यामध्ये बॅटरीज दिलेल्या असतात त्यांची मात्र देखभाल करणे आवश्यक असते.
  7. सोलार एसी हे कमी जागा व्यापतात.

मी माझ्या सध्याच्या एसीमध्ये सोलर जोडू शकतो का?

तुमच्याकडे अगोदरच असलेल्या एअर कंडिशनरमध्ये सोलार पॅनल जोडणे हा मार्ग सुद्धा तुम्ही विचारात घेऊ शकता. अनेक राज्ये घरमालकांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या AC युनिट्सवर स्विच करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून करावर क्रेडिट्स सुद्धा प्रदान करतात.

हे ही वाचा<< थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत

सोलर पॅनेल एसीची भारतातील किंमत

भारतातील सोलर पॅनल एसीची किंमत उत्पादनाच्या प्रकार आणि ब्रँडनुसार बदलते. साधारणपणे, २० ते ५० हजार रुपयांमध्ये तुम्हाला हा एसी विकत घेता येऊ शकतो. थोडं कठीण काम असल्याने हा एसी खोलीत बसवण्याचा खर्च १० -२५ हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो. ही रक्कम कदाचित पारंपरिक एसीच्या काही पट जास्तच वाटू शकते पण याचे संभाव्य फायदे व भविष्यातील बचतीची आकडेमोड केल्यास हा व्यवहार फायद्याचाच वाटतो.