या वर्षाचे शेवटेचे सूर्यग्रहण ४ डिसेंबर २०२१ रोजी लागणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यावर आपल्या ग्रहावर सावली पडते तेव्हा सूर्यग्रहण होतं. किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जातात, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येते, त्यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारचं असतं. संपूर्ण सूर्यग्रहण होण्यासाठी, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असणे आवश्यक असते. चंद्राच्या सावलीच्या मध्यभागी जेव्हा ते पृथ्वीवर येते तेव्हा संपूर्ण ग्रहण दिसतं. सूर्यग्रहणाच्या वेळी आकाश गडद होतं, पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेसारखं दिसतं. अवकाशाच्या रंगमंचावर घडणारा हा नयनरम्य सोहळा अर्थात सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोल अभ्यासक व हौशी अवकाश निरीक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. हे सूर्यग्रहण फक्त अंटार्क्टिका किंवा दक्षिण गोलार्धातच दिसणार आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी, दर्शकांना संपूर्ण सूर्यग्रहण पाहता येणार नाही, तर त्याऐवजी ते आंशिक सूर्यग्रहण अनुभवतील. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत नसतात तेव्हा आंशिक सूर्यग्रहण दिसतं.
सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याच्या पृष्ठभागाच्या एका विशिष्ट भागावर गडद सावली असेल. NASA ने दिलेल्या माहितीनुसार, सेंट हेलेना, नामिबिया, लेसोथो, दक्षिण आफ्रिका, दक्षिण जॉर्जिया आणि सँडविच बेटे, क्रोझेट बेटे, फॉकलंड बेटे, चिली, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील लोकांना ४ डिसेंबर रोजी आंशिक सूर्यग्रहण पाहता येईल. सूर्यग्रहण थेट उघड्या डोळ्यांनी पाहू नये याची नोंद घ्यावी. आंशिक सूर्यग्रहण पाहताना प्रत्येकाने सूर्यदर्शन किंवा ग्रहण पाहण्याचा चष्मा घालणे आवश्यक आहे.
जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ठिकाणी राहत नसाल, तर तुम्ही थेट लाईव्ह इव्हेंटमध्ये हे सूर्यग्रहण पाहू शकता. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण जर तुम्हाला पाहायचे असेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण, आता कोणीही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हे सूर्यग्रहण पाहू शकता. खरं म्हणजे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षितता म्हणून सूर्यग्रहण पाहणाऱ्याला चश्माचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात काही उपलब्ध आहेत. अनेक यूट्यूब चॅनेल आहेत. ज्यावर सूर्यग्रहणला लाइव्ह स्ट्रीम करतात.
या लिंकवरील लाईव्हवरून पाहू शकता सूर्यग्रहण :
जर आकाश निरभ्र असेल आणि हवामान अनुकूल असेल तर, युनियन ग्लेशियर, अंटार्क्टिका येथील संपूर्ण सूर्यग्रहण YouTube आणि nasa.gov/live वर प्रसारित केले जाईल. लाइव्ह स्ट्रीम भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होईल. भारतीय दर्शकांसाठी, ग्रहण दुपारी १२.३० मिनिटांनी सुरू होईल. दुपारी १.०३ मिनिटांनी शिखरावर पोहोचेल आणि दुपारी १. ३६ मिनिटांनी समाप्त होईल.