भारतामध्ये अनेक ठिकाणी शिवमंदिरे पहायला मिळतात. केवळ श्रद्धा आणि भक्तिभाव नव्हे, तर शिल्पसंस्कृतीचा उत्तम नमुना म्हणून शिवालयांकडे पाहिले जाते. आज महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला आम्ही भारतामधील सात प्राचीन शिवमंदिराबद्दलची माहिती देणार आहोत.

MahakumbhMela 2025
Mahakumbh Mela 2025: हिंदू साधू हे व्यापारी की योद्धे? साधूंचे आखाडे नेमके आहेत तरी काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका
जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्याचा 'पद्मश्री'ने गौरव, कोण होते भुलई भाई? (फोटो सौजन्य @AmitShah एक्स अकाउंट)
Padma Shri Award 2025 : जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्याचा ‘पद्मश्री’ने गौरव, कोण होते भुलई भाई?

विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)– वाराणसी भारताची सांस्कृतिक राजधानी असून ते  गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यावर विश्वनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे.

रामेश्वरम – तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर असलेले एक शिवमंदिर आहे. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी व १००० फुट लांब , ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे रामेश्वर चे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळेस भगवान शंकर व पार्वतीची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते.

मल्लिकार्जुन – रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. हे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आहे. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पाच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.

लिंगराज मंदिर – ओडीसामध्ये असलेले लिंगराज मंदिर प्राचीन शिवमंदिरापैकी एक आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी असते.

केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ) – हे हिमालयात उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. केदारनाथ हे ज्योतिर्लिंगांबरोबरच चार धामांपैकी एक धामही आहे. प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते.

कर्नाटकातील मुरुडेश्वर शिव मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. त्यामुळे शांत आणि सुंदर वातारणामध्ये असलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी शिवभक्तासह पर्यटकही येतात.

अमरनाथ गुफांचे दर्शन करण्यासाठी पर्यटक विदेशातूनही येतात. येथे बर्फाचे शिवलिंग तयार होते.

Story img Loader