अनेकदा आपल्या आवडीची गोष्ट आपल्या जवळपासच असते परंतु ती आपल्याला मिळत नाही. आपला बेजबाबदारपणा, माहितीचा अभाव यामुळे आपल्याला हवी ती गोष्ट मिळू शकत नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळविण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. परंतु याबरोबर आपल्याला चांगले आरोग्य, आकर्षक आणि सुंदर शरीर मिळाले आणखी काय हवे ? कारण सौंदर्याने माणसाला जेवढा आनंद मिळतो तेवढाच तो स्वत:ला सुंदर दाखविण्यात मिळतो.
१. सकाळी सूर्योदयाच्या वेळी दररोज एक दोन ग्लास कोमट पाणी प्या आणि काही काळ फिरून या.
२. रोजच्या आहारात किमान एक लिंबू असू द्या.
३. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान २ ते ३ किलोमीटर पायी चाला. चालण्याला एक गती असू द्या.
४. सकाळच्या न्याहरीत फक्त मोड आलेली कडधान्ये खा.
५. फास्ट फूड, तळलेले, अधिक फॅट असलेले, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्य खाऊ नका.
६. दिवसा झोपू नका.
७. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.
८. रात्रीचे जेवण रात्री ८ च्या आधी करा.
९. चहा, कॉफी आणि शीतपेये शक्यतो टाळा.
१०. दिवसातून जास्तीत जास्त दोन नाष्टा आणि दोन जेवण याहून अधिक काहीही नको.
११. रोज रात्री अमृतासमान गुणकारी असलेले त्रिफळा चूर्ण घ्या.

Story img Loader