प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे आज २३ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ४१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नक्की काय होत? अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातही येत नाही. हल्ली तंदुरुस्त लोकांनाही यामुळे आपला जीव गमवावा लगतो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु काहीवेळा हा झटका इतका धोकादायक असतो की त्या व्यक्तीचा क्षणार्धात मृत्यू होतो.

आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी

भारतातील हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागची बरीच कारणे आहेत, मात्र हा विकार होण्यामागे एक कारण सर्वाधिक जबाबदार आहे व ते म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल. बऱ्याच वेळा आपण लहानसहान शारीरिक दुखापतींकडे दुर्लक्ष करतो. परंतु हेच लहान वाटणारे आजार नंतर बळावतात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीदेखील अशीच काही दुखणी उद्भवतात. त्यामुळे वेळीच हृदयविकाराची लक्षणे ओळखणं गरजेचं आहे.

बऱ्याच वेळा छातीत दुखत असतं त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. गॅसमुळे दुखत असेल किंवा जड ओझ उचलल्यामुळे दुखत असेल असं म्हणून आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी बऱ्याचदा छातीत दुखतं. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल, तर हे लक्षण दिसून येते. त्यामुळे छातीत दुखायला लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

तसेच, बऱ्याच वेळा अचानकपणे दरदरुन घाम फुटू लागतो. हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षणं आहे. अनेक वेळा हातामध्ये, दंडामध्ये किंवा मानेमध्ये अचानकपणे वेदना जाणवते, पायांना सूज येते, पाय दुखतात. हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांमध्ये ही देखील लक्षणे असू शकतात. बऱ्याच वेळा अचानकपणे चक्कर येते. अचानकपणे पोटात दुखणे. काहींना उलटीदेखील होते. अनेकदा तिखट किंवा तेलकट पदार्थ खालल्ल्यामुळे छातीत जळजळल्याची समस्या निर्माण होते. परंतु काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीही छातीत जळजळ होते.

३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे. २ डी इको आणि टीएमटी यासारख्या चाचण्या हृदयाच्या अडथळ्याचे निदान करण्यात मदत करू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader